"तुमची घोडी साडेपाचशेला देता का? पाहा पटत असेल तर उद्या घोडी आमच्या घरी घेऊन या. घरी पैसे देईन. आज सौदा ठरवून ठेवू." एकजण निश्चित स्वरात म्हणाला.
"ठीक. साडेपाचशेला देऊन टाकतो. तुम्हांला उत्क्रृष्ट घोड्यांचा षोक आहे. ही घोडी तुमच्याकडे जाण्यात औचित्य आहे. केवळ पैशांकडेच बघून चालत नाही." ठकसेन म्हणाला.
"सायंकाळ होत आली. लोक घरोघर जाऊ लागले. ठकसेन आपल्या घोडीवर बसून निघाला. उद्या घोडी दुसऱ्याच्या घरी जाणार होती. दादाने ठकसेनाला त्या घोडीवर कधी बसू दिले नव्हते. आज घोडी दौडवावी, हौस फेडून घ्यावी असे ठकसेनाच्या मनात आले. त्याने घोडीला टाच मारली, घोडी वाऱ्याप्रमाणे निघाली. घोडी बेफाम सुटली. ठकसेनाला ती आवरेना. बाहेर अंधार पडू लागला. ठकसेनला समोर दिसेना. शेवटी घोडी एकदम एक खळग्यात पडली! ठकसेन बाजूला पडला. तो चांगलाच आपटला. घोडी तर दगडावर आपटून तात्काळ गतप्राण झाली. ठकसेन लंगडत कण्हत घोडीजवळ गेला. घोडीचे प्रेत तेथे होते. आता पैसे? साडेपाचशे रूपये कोठून मिळणार? आज मेली ती उद्या विकल्यावर मरती तर? घोडीचे ठकसेनाला काहीच वाटले नाही, परंतु पैशांचा प्रश्न त्याच्यासमोर होता.
तो उठला. अंधारातून चाचपडत निघाला. हातात सोन्याच्या मुठीचा चाबूक होता. गाव जवळ आला होता. आता त्याला प्रथम मनू विणकराचे घर लागले असते. भुतासारखा राहणारा मनू! मनूजवळ खूप पैसा आहे. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या पिशव्या आहेत. मनूच्या घरी आपण दरोडा घातला तर? मनूला एकदम जाऊन भिवविले तर? त्याला धाकदपटशा दाखवला तर? मनूचे पैसे लांबवावे, लुबाडावे, असा विचार ठकसेनाच्या मनात आला. त्याला ती सोन्याची नाणी दिसू लागली. तो जणू स्वप्नात होता.
इतक्यात एकाएकी वादळ उठले. गार वारा वाहू लागला. आकाशात ढग जमले. अंधार अधिक दाटला. ठकसेन झपझप चलू लागला. मनू विणकराची झोपडी आली. झोपाडीचे दार उघडे होते. आत चुलीत
जमीनदार व त्याचे दोन मुलगे * १७