Jump to content

पान:मनूबाबा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घराला ते ज च ढ लें . ३५ वस्त्रे विणली. नववधूसाठीं वस्त्रे विणलीं. त्याला भरपूर मजुरी मिळाली. लहानग्या मुलीसाठी ती झाली.

लग्नाचा दिवस आला. मोठा सोहळा झाला. लग्न लागलें. वधूवरांन परस्परांस माळा घातल्या. बार वाजले, वाजंत्री वाजलीं, चौघडे वाजले. रात्री मोठी वरात निघाली. घोड्यावर बसून वधूवरें जात होतीं. चंद्रज्योति लाविल्या जात होत्या. मनूबाबा त्या लहान मुलीला वरात दाखविण्यासाठी उभा होता. ती लहान मुलगी वरात बघत होती. घोड्याकडे बोट दाखवीत होती. संपतरायाचें लक्ष त्या मुलीकडे गेलें. त्याच्या डोळ्यांत पाणी आलें. आईवेगळी मुलगी. अरेरे!

गांवांत मोठी मेजवानी झाली. झाडून साऱ्या गांवाला लाडू मिळाले. परंतु मनूबाबा जेवायला गेला नाहीं. त्याच्या घरीं लाडू पाठविण्यांत आले. त्या लहान मुलीला सुंदर कपडे पाठविण्यांत आले. बाळलेणे पाठविण्यांत आलें. परंतु मनूबाबानें तें बाळलेणे मुलीच्या अंगावर घातलें नाहीं. त्यानें ते कपडे तिला चढविले नाहींत. तो म्हणाला, " मी माझ्या श्रमाने पैसे मिळवीन व बाळलेणें करीन. मी स्वतः सुंदर वस्त्रे विणीन व त्याचीं आंगडीं या मुलीला करीन. लोकांचीं कशाला ? "

वधूवरांस सर्व गांवानें दुवा दिला. वधूवरांचा नवीन संसार सुरू झाला. इंदुमती आतां या सासरी राहायला आली. सासू नव्हतीच. तीच आतां घरधनीण होती. घरांत येतांच तिनें घराला कळा आणली. सारा वाडा तिनें स्वच्छ झाडायला लावला. कोळिष्टके उडून गेली. वडा आरशासारखा झाला. वरतीं दिवाणखाना होता. त्यांत मोठमोठ्या तसबिरी होत्या. त्यांच्यावर खंडीभर धूळ बसली होती. इंदुमतीनें स्वतः ती धूळ पुसून काढली. तसबिरी प्रसन्न दिसूं लागल्या. दिवाणखान्यांत स्वच्छ बैठक घालण्यांत आली. शुभ्र असे लोड तेथें ठेवण्यांत आले. फुलदाणीत फुलांचा गुच्छ तेथें ठेवण्यांत आला. दिवाणखान्याला तेज चढलें. म.३