पान:मजूर.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण २० वें

ऋणानुबंध.

जशीं आजवर आमच्या आयुष्यांत सकटें येतां येतां अगदीं परमावधी

झाली तशच आमच्या सुखाला सुरवात होतां होतां-आमच्या कल्पनेचा प्रांत आम्हांला मिळणाऱ्या सुखांनी केव्हांच ओलांडला ! 'आतां की घटकेनें सर्वस्व नाश होतो आहे असा काळ गेला, तर आतां सुखाच्या संबंधांत, एकाहून एक अशीं विलक्षण स्त्यिंतरें दर घडीला आमच्या आयुष्यांत घडत चालली होतीं !

आमचा आयुष्यक्रमच विलक्षण योगायोगानें भरलेला होता, यांत

शंका नाहीं ! वाईटाच्या वेळी बाईटाचा कळस करणारे जसे योगायोग होते तसेच त्याच्या अगदी उलट स्थितीत असतांनां तसेच योग पाव- लागणीके येत असत !

अशाच योगांपैकी आमचा योग म्हणजे आतां या योगाची हकीकत

सांगायलाही मला लाज वाटत आहे ! हा योग कोणत्या भाषेत सांगावा, याची मला पंचाईत पडली आहे ! म्हणजे मला माझी योग्य मर्यादा राखून सांगतां येईल, आणि सर्वांना स्पष्ट कळेल ! " हो ! विलक्षण योग म्हणजे असा. आतां आम्ही पूर्वीच्याच सारखे राहिलों नव्हतों ! अशाच कांहीं दैवी घटनेनें- अदृश्य आकर्षणानें, बबू- ताई, आणि मी नुसत्या मैत्रिणी मैत्रिणीच राहिलों नव्हतों ! तर एक- मेकींच्या वहिनी झालो होतो !! संतुदादाला पहिल्याप्रमाणें मी हांक मारतें तशी बबुताईला हांक मारतां यायचे बंद झाले होतें; तर तिच्या बंधूराजांचें – हश्च ! हे म्हउतांना देखील आतां मला लाज वाटते, आणि जीभ अडखळते आहे !.मी नांव घेत नव्हते ! बबूताई दादाच्या भविष्याची भाग्यदेवता बनली होती, तर तिकडच्या पदरी पडून मी पवित्र झाले होतें ! !