पान:मजूर.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हरिः ॐ

 ईश्वर प्रत्येकाला आयुष्यांत एकेकदां तरी संधी देतच असतो. ती संधि उघडे डोळे ठेऊन ज्याला साधतां येते, तो भाग्यशाली म्हणा- वयाचा' असें सिद्धांत वाक्य आहे. हीच प्रचिती 'महाराष्ट्र कुटुंब - माला' सुरू करतांना ईश्वर आम्हाला पटवीत आहे. 'माले'च्या कल्पनेचा जन्म होऊन अवघे दोन महिने पूर्ण होण्याच्या आंत मालेचे सदर पुष्प आम्हांला आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेस सादर करतां आलें आहे, यावरून ईश्वराने संधि दिली, आणि आम्ही ती साधली, असेंच निरभिमानतेनें व प्रेम भक्तियुक्त अंतःकरणाने म्हणण्यास आम्हांला आनंद वाटतो.
 'माले'च्या कल्पनेचा जन्म होतांच तिला उचलून धरून तिचे संपादकत्व ' माईसाहेब' नाटकाचे कर्ते श्री. नारायण विनायक कुळकर्णी व श्री. काशिनाथ नरसिंह केळकर, बी. ए. (टिळक) यांनी आपल्याकडे हौसेने घेतले. तसेच 'माले'ला हरएक बाबतींत योग्य तें विचारसहाय्य देण्यास सल्लागार मंडळ सुविद्य, उत्साही, समंजस, आणि दिलदार असें मिळालें, हें मालेचे भाग्यच होय.
 'मालें'त या वर्षातील पुष्पांची नांवनिशीवार माहिती 'माले'च्या सोबतच्या माहितीपत्रकांत दिलीच आहे. त्याशिवाय आम्हांला येथे हेही सांगून टाकण्यास हरकत वाटत नाहीं, कीं दुसऱ्या वर्षीचे पहिले पुष्प मालेचे सहसंपादक श्री. बापूराव केळकर यांचेच वाचकांच्या हातीं आम्हां- ला देता येणार आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रातील विख्यात पदवीधर लेखकही आपापली पुष्पें 'माले'त गुंफावयाला देऊन मालेला ऋणी करणार आहेत. 'मात भावंडांच्या भेटी' हैं एक सदर मुद्दाम ठेवण्यांत आले आहे. मालेच्या तीन महिन्याच्या अवकाशांत जीं मराठी पुस्तकें बाहेर पडतील -ज मालेच्या आटोक्यांत येतील, त्यांच्या सप्रेम भेटी नियमित नमूद करून ठेवण्यांत येणार आहेत. हा प्रकार आमच्या प्रिय आश्रय- दात्यांना आवडेल अशी आम्ही आशा करतों. पहिल्या पुष्पांत ज्यांच्या