पान:भूमी आणि स्त्री.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हादगा उर्फ भोंडल्याच्या पूजेच्याही प्राचीन असावी. डॉ. मधुकर वाकोडे या संदर्भात नोंदवितात 'हादगा हा लौकिक स्वरूपाचा पर्जन्यविधी आहेतर भुलाबाईहा सुफलन विधी आहे. हादगा वर्षनशील तर भुलाबाई सर्जनशील आहे. अर्थातच नवनिर्मितीच्या क्षमता दोन्ही विधीत दिसून येतात.'
 वऱ्हाड, खानदेश, नासिक-मालेगावचा भाग, हिंगोलीजवळचा परिसर- या भागात भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यन्त भुलाबाई मांडली जाते. भुलाबाई म्हणजे पार्वतीबरोबर भुलोबा म्हणजे 'शिव' असतो. ही शिवशक्तीची पूजा आहे. सर्जनाचे प्रतीक पार्वती तर, शिव म्हणजे 'बीज'. ही पूजाही सुफलीकरणाचाच एक विधी आहे. या कुमारिकाच्या लोकोत्सवांचा चिकित्सक शोध 'हणमंताची निळी घोडी' या टिपणात डॉ. मधुकर वाकोडेंनी घेतला आहे. त्यांच्या मते, वरवर पाहता निरर्थक वाटणाऱ्या भुलाबाई वा भोंडल्याच्या गाण्यांत अप्रगत अवस्थेतील मानवी मनाचा आविष्कार आहे.
 स्त्री ही सर्जनाचे प्रतीक आहे. तारुण्यात प्रवेश करण्यास उत्सुक अशा मुलींत सर्जनशक्तीचा विकास व्हावा हा हेतू या उत्सवामागे असावा. स्कंद हा शंकाराच्या परिवारातला आणि आश्विन महिना हा स्कंदाचा. १६ वर्षांच्या खालील मुलामुलींना पीडा देण्याचा अधिकार स्कंदाने आपल्या अनुयायांना दिला आहे अशी कल्पना आहे.
 कुमारिकांचे उत्सव भारतभर -
 हस्त हे १३ वे नक्षत्र असून, ते कन्या राशीत येते. हे स्त्री नक्षत्र आहे. हा सहा तारकांचा पुंज असतो.आश्विन हा स्कंदपूजेचा महिना असून स्कंद ऊर्फ कार्तिकेयाची शक्ती 'कौमारी' ही मानली जाते. म्हणूनच या महिन्याला 'क्वारका महिना' म्हटले जाते. भोंडला, भुलाबाई, हादगा हे महाराष्ट्रातले आणि सांझी, मामुलिया हे मध्य प्रदेशातले कुमारिकांचे उत्सव याच काळात का येतात याचे रहस्य कळते. रसपूर्णतेला पोहोचणाऱ्या आणि उद्याची निर्मिती करण्यास सक्षम बनवणाऱ्या कुमारिकांना असुशक्ती प्राप्त व्हावी यासाठी केले जाणारे हे कुमारिकांचे उत्सव भारतभर साजरे केले जातात.
 उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशात सांझी उर्फ सांजाबाई याच काळात मांडली जाते. गुजरातेत कुमारिका गरबा खेळतात. उत्तर प्रदेशात नवरात्रात कुमारीपूजा

भूमी आणि स्त्री
८१