Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/२०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दक्षिण भारत ज्येष्ठा या विघ्न देवतेच्या उपासनेने भारलेला होता. प्राचीन तामिळ निघंटूत तिच्यासाठी मुगडी, भूदेवी, केदाई अशी नावे आहेत. तिला 'खरारुढा' मानले असून तिचे आयुध 'मार्जना' म्हणजे केरसुणी हे असे निघंटू सांगतो.
 ज्येष्ठाकल्पातील तिचे रूप पुराणकाळापेक्षाही प्राचीन आहे -

यस्यास्सिंहा रथे युक्ता व्याघ्राश्चाप्यनुगामिनः ।
तामिमां पुंडरीकाक्षी ज्येष्ठामावाह्याम्यहम ॥

 तिची कुंभी, प्रकुंभी ही नावे विश्वाचा गर्भ उदरी वाहणाऱ्या महामातृत्वाचा संकेत देणारी आहे. म्हणून तिचे उदर लांब आहे. ती विघ्नपार्षदा कपिलमुनींची पत्नी आहे. तिला श्री, वरदा, सत्या असेही म्हटले आहे. ज्येष्ठेच्या या रूपाशी आणि कार्याशी विघ्नहर्त्या विनायकाचे साम्य आहे. गणेशचतुर्थीनंतर लगेच गौरी वा लक्ष्म्यांचा सण येतो. ज्येष्ठेचा सण येतो. यांतील अनुबंध महत्त्वाचा आहे. या अनुबंधावर श्रीमती स्टेला क्रामरिश यांनी 'भारतीय महादेवी' या बृहत् लेखात अलक्ष्मी निऋक्तीच्या वर्णनप्रसंगी सूचक टीपं लिहिली आहे. ती पुढील प्रमाणे -
 The dread name of Nirrti also carried by Jyeshtha, the inauspicious, pot-bellied goddess with an elephant face whose retinue are obstacles. In this respect she prefigures Ganesa the lord and remover of obstacles. How ever, the chariot of Jyeshtha, drawn by lions and follows by tigers, is proper to the great goddess. (लोक दैवतांचे विश्व : . रा. चिं. ढेरे पान ३१).
 गणेश आणि ज्येष्ठा यांच्यातील साम्यावर श्रीमती क्रामरिश यांनी नेमके बोट ठेवले आहे.
 प्राचीन भारतातील लोकजीवनाचे वैशिष्ट्य मातृसत्ता -
 वैदिक आर्य भारतात स्थिर होण्यापूर्वी भारतात मातृसत्ताक समाज होता. विशिष्ट सामाजिक आर्थिक स्थितीत वाढलेल्या गणसमाजांचा मातृसत्ता हा विशेष होता. स्त्रियांचे उत्पादन व्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान होते.

२०४
भूमी आणि स्त्री