पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विक्रीस तयार पुस्तकें.

 साकीबद्ध रामायण.

 स्वदोषनिरीक्षण. (निबंध )

 भाषासौंदर्यशास्त्र. मराठी भाषेंत गद्यरचनेंत म्हणजे निबंध, संवाद, स्फुटलेख वगैरे ह्यामध्यें जेव्हां भाषेस शोभा आणण्याची आवश्यकता असते तेव्हां त्यांस लागू पडणारे शब्द, वाक्य, अर्थ, रस, अलंकार आणि भाषासरणि ह्या संबंधाचे जे नियम त्यांचें सलक्षण व सोदाहरण विवरण ह्या पुस्तकांत केलेले आहे. मराठी सहावे इयत्तेंतील ट्रेनिंगकॉलेजांतील व इंग्रजी शाळेंत मराठी भाषा घेणारे विद्यार्थी यांना हें पुस्तक फारच उपयोगी पडणारें आहे; असें कित्येक विद्वानांचें मत आहे. किंमत एक रुपया. टपालखर्च निराळा. पुस्तकें आमचेकडेस मिळतील.


धार, मारुतीपुरा.}  सदाशिव बापुजी कुळकर्णी

(सेंट्रल इंडिया.)    वकील.