पान:भाषाशास्त्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ भाषाशास्त्र. विवरांतील अनेक स्थलें, म्हणजे कंठ, तालु, मूर्धन्, दन्त्य, आणि ओष्ठ्य ह्यांपैकी ज्या ज्या स्थानास तो स्पर्श करतो, त्या त्या स्थानाचा उघडच वर्णोच्चार होतो; व हे वर्ण क ठिण, मृदु, तीव्र, ऊष्ण, व्हस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनु- दात्त, स्वरित, याप्रमाणे जसे कभी ज्यास्त अवसानाचे असतात, त्या मानाने वर्णोच्चारालाही अवश्य तो काल आणि यत्न लागतो. येथे, कदाचित् वाचकास अशी शंका येईल की, इच्छा शक्तीच जे आम्ही सदरों एवढे मोठे महत्व सांगितले, ते तसे असल्याचें, कोणत्याही प्रकारें, केव्हां देखील, बि- ढकुल भासमान होत नसून, इच्छाशक्तीचा आणि आप ल्या शरीराचा काडीमात्र सुद्धा संबंध नाहीं. परंतु, हा भा क्षेप केवळ निराधार व निरर्थक आहे, असे पुढील विवेच नावरून वाचकाच्या लक्षांत तेव्हांच येईल. इच्छाशक्ति, मन, आणि शरीर, यांचा संबंध. आपले अतिसूक्ष्म व अदृश्य मन, आणि आपला स्थूल व जड देह, यांचा इतका निकट संबंध आहे की, एकाचा कार्यकारणभाव दुसऱ्यावर आपली अम्मलबजावणी हं म्हणता करतो. उदाहरणार्थ, आपल्या मनांत उठावयाचें आले की, आपण लागलौंच आसनावरून उठतों. इतकेंच नव्हे तर, अन्य कांहीं व्यापार करण्याविषयी आपल्या मना- ची इच्छा व प्रवृत्ति असल्यास, आपण तो तो व्यापार व क्रिया तत्क्षणींच करूं लागतो. ह्याचें कारण असे की, आपल्या मनाचा आणि ज्ञानतंतूंचा अगदीच प्रत्यक्ष संबंध असून, हे ज्ञानतंतू आपल्या एकंदर शरीरांत सर्वत्र पसर- ,