पान:भाषाशास्त्र.djvu/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० भाषाशास्त्र. असे. परंतु, आसपासच्या प्रबल लोकांनी तिला हांकन लाविल्यामुळे, अठराव्या शतकाच्या आरंभीच तिला सैबी. रिया प्रांत सोडणे भाग पडले, व ती चिनी-तुर्कस्थानांत जाऊन राहिली. ह्यांच्यांत अनेक भेद आहेत. त्यांपैकी, १ किरगिज-कासक हे बुरुतच्या पश्चिमेस चीन आणि रूस यांच्या छत्राखाली राहतात. किरगिज-बुद्रुक हे पूर्व भागाला असतात. किरगिज-दरम्यान यांची वस्ती सरसु उ थेंबा या नद्यांच्या मधल्या प्रदेशांत असून, हे लोक मोठे बलाढय असल्याचे कळते. किरागज-खुर्द यांची वस्ती पश्चिम बाजूला, येबा आणि यूरल नद्यांच्या दरम्यान आहे. हे सर्व परकी अमलाखाली असून, इ० स० १८१९ पासून, रूसच्या ताब्यांतच आल्याचे कळून येते. तुर्की भाषा, आणि तुर्की वैभव व पातशाही, यांचा निःसंशय फारच निकट संबंध आहे. तुर्की भाषेच्या प्र या - त्यामुळे, पहिलीच्या प्रौढावस्थेचा इतिसाराचा इतिहास. हास कळण्याची आवश्यकता अस. ल्यास, दुसरीचे इतिवृत्त जाणणे खरोखरच जरूरीचे आहे. सबब, वाचकांच्या सोईसाठी, तुक लोकांचा त्राटक वृत्तांत येथे देतो. | तुर्की लोकांचे फारा दिवसांचे निवासस्थान खोरासान होय. परंतु, ह्या प्रान्तावर मोगलांनी स्वारी केल्याकारणानें, तो त्यांनी सोडला, आणि पश्चिमेकडील सीरिया, आर्मीनिया, व आशिया खुर्द ( मायनर ), येथे प्रयाण केलें. सुलेमान पातशाहा त्यांचाच सरदार होता. त्यायोगाने, इ० स० १२२४ साली, त्यालाही त्यांनबरोबरच जावे लागले.