पान:भाषाशास्त्र.djvu/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र, माळराने आहेत, त्यांजला त्यांचेच नांव असल्यावरून व्यक्त होते. परंतु, मोगली जातीच्या कालमुक लोकांना त्यांजवर हल्ला केल्यामुळे, ते पश्चिमेकडे हटले, व आस्वाखान जवळ त्यांनी आपली वस्ती केली. तथापि, | पहिल्या पीटरने त्यांची उचलबांगडी केल्यामुळे, त्यांची तेथेही डाळ शिजली नाही. त्याकारण्याने, त्यांनी आपला गाशा तेथून गुंडाळून, काकेसस पर्वताच्या उत्तरेस क्यूबन | आणि क्यूमा नदीतीरीं ते जाऊन राहिले, व ते अजून सुद्धा तेथेच आहेत. मात्र, कुन्दुर नांवाची जात व्होल्गा नदीवर असून, ती कामुकांच्या ताब्यात आहे. इ० स० च्या पंधराव्या शतकापूर्वी, बजाणी लोक माजरी शहरांत क्यूमा तटीं राहत असत. परंतु, हल्ली ते क्यूबन नदीच्या उगमाजवळच असल्याचे कळते. कुमुक लोक काकेसस पर्वतावर सुंजा, अकसई, आणि कोयसू नदीवर असून, ते तद्देशी राजांच्या अमलांत आहेत. तथापि, हे राजे देखील आपणांस रूस देशाचे अंकितच मानतात. बषकीर लोक चार रस्त्यांच्या चवाट्यावर कामातटों राहतात, व त्याला सैबीरियापथ, कसनपथ, नोगाईपथ, आणि ओसापथ म्हणतात. ह्यांच्या नजीकच, पूर्वी व्होल्गा नदीजवळ असलेली मासचिराक नांवाची एक जात राहते. ह्या सर्वांवर रूसचाच ताबा आहे. अरल्सरोवराच्या आसपास कार-कलपाक नांवाचे लोक राहत असून, त्यांच्या वर रूसचा व खीवाच्या खानाचा अंमल आहे. सैबीरि| याच्या तुकस तार्तर म्हणतात. ह्यांची मुख्य वसतिस्थाने म्हटली म्हणजे तोबालस्क, येनीसीस्क, आणि तोमस्क,