पान:भाषाशास्त्र.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ सामान्यविवेचन व दिग्दर्शन. आणखी ज्यास्त शोध लावण्याची आवश्यकता असल्याविषयी कांहीं विद्वानांची समजूत आहे. ३ तुराणी भाषेचे दोन पोटभेद आहेत. १ उत्तर तुराणी, आणि २ दक्षिण तुराणी. तुराणी व तिचे पोटभेद. उत्तर तुराणाला उग्रीतार्तरी किंवा | यूरल-आलताई म्हणतात, व हिच्या १ तुंगुस्की, २ मोगली, ३ तुर्की, ४ फिनिक, आणि ९ सामोपेडी, अशा पांच शाखा आहेत. दक्षिण तुराणीला तामिली म्हणतात. हिचा प्रसार आशिया खडाच्या दक्षिणेस असून, तिच्या चार शाखा आहेत. १ त्रिविष्टप ब्रह्मी, २ कुलाली, ३ द्राविडी, आणि ४ मल्याली किंवा सामुद्रिक. ह्या सर्व शाखांचे अनेक प्रकार आहेत. सबब, ते वाचकांच्या सोईसाठी, ज्या त्या शाखेसमोर येथे देतो. १ उत्तर तुराणी किंवा उग्री-तार्तरीच्या शाखा, व त्यांचे पेटभेद. १ तुंगुसी:-चापोगायरी. ओरोतोंगी. लामूटी (ओ- तुंगस्की. खाटस्कचा किनारा ). मंडशु (चीन). २ मोगली:--शरा मोगली (गोबीच्या दक्षिणेस ). मोगली. खल्खा ( गोबीच्या उत्तरेस ). शरागोली ( तिबेट व तिगुट ). चोशॉटी ( कोकोनूर ). संगूरी. | १ हिला कित्येक पाश्चात्य पंडितांनीं तालियन अशी संज्ञा दिली आहे. तथापि, ही भाषा आर्यशाखेपैकी असल्याचे दिसते, व कित्येक पाश्चात्यांचेही तसेच मत आहे. ( भारतीय साम्राज्य. पु. ९ वें. पान १९९ ते २३३ पहा.)