पान:भाषाशास्त्र.djvu/394

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शब्दापभ्रंशाचा त्रोटक विचार. ३८५ १३ अनुस्वाराचा व अंत्य तिचा क्वचित् लोप होतो. उ० . विंशति = वीस. त्रिंशत् = तीस. १४ बच्या ठिकाणी व; ड च्या जागी ल किंवा ळ; कचा ख; पचा ख; असेही आदेश होतात. उ० १ बाष्प = वाफ. २ गुड = गूळ. ३ कीलक = खिळा. ४ औषधं = ओखद. १६ संस्कृत शब्दांतल्या जोडाक्षराचे आद्य अवयव श, ष, स, असल्यास त्यांचा लोप होतो. उ० श्मशान=मसण शुष्कः = मुका. १६ संयुक्त थचा ठ होता. उ० १ ग्रंथि = गांठ. २ उत्थानं = उठणे. १७ क्वचित् ठचा ढ होतो. उ० पठणं = पढणे. १८ त आणि दच्या जागी ड होतो. उ० पतनं = पडणें, दोलनं = डोलणे. १९ पच्या जागी फचा आदेश होते. उ० पाशः = फांस, पनस = फणस. २० श आणि पच्या जागी सचा आदेश होतो. उ० १ वंश = वासा. २ पोषणं = पोसणे. २१ क्षचा ख अथवा स होतो. उ० १ लाक्षा = लाख. २ कक्षा = काख. खाक. ३ कुक्षि = कूस. २२ द्यच्या जागी ज होतो. उ० अद्य = आज, २३ ष्ट अथवा छ यांच्या ऐवजी ठ किंवा डे होतो. । उ० १ ओष्ठ = ओठ. २ पृष्ट=पाठ. ३ काष्ट=काडी. २४ आद्याक्षर लघु असून, तदनन्तरचे जोडाक्षर असले तर, • त्या जोडाक्षराच्या एक अवयवाचा लोप होतो, आणि | ३ 3.