Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३६७ ‘जे' हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय प्राचीन लेखांत विशेषेकरून आढळते. किंबहुना त्याचा प्रयोग हल्लीच्या मराठी भाषेत केला असल्याचे फारसे दिसतचे नाही, असे म्हटले असतांही चालेल. हे अव्यय संस्कृतांतनच महाराष्ट्र भाषेत आले असून, संकृतांत 'जे' च्या ठिकाणी ' यत्' यासंबंधी सर्वनामाचा उपयोग करण्यांत येतो. उदाहरणार्थ, ६ अपि का सा स्फूर्तिः यद् ब्रह्मेवाहनसंसारी ति। ( काय ? ही कसली स्फूर्ती झाली ? मी संसारी नाही, व ब्रह्म च आहे, अशा बद्दलची कां ?) प्राचीन भाषेत, जेचा प्रयोग ‘की' या अर्थाने करण्यांत येत असे; आणि सांप्रत काळी, फक्त रोख्यांत व दस्तैवजी कागदांतच तो अशा अर्थाने आढळतो. जसे, * कृष्णाचे उत्तर ऐकून, अर्जुन बोलिला जे, अपराध पोटी घाली माझे." * फरोक्त खत लिहून देतो जे. “ हा करारनामा लिहून दिला, जाणिजे. इत्यादि. । सदरी ( मागे पान ३६ ४ पहा ) प्रत्यय म्हणजे काय, । हे सांगून, तत्संबंधी आम्हीं अवश्य ते अव्ययाचे लक्षण. विवेचनही केले. सबब, आतां अव्ययाचे लक्षण देऊन, त्याबद्दलचा त्रोटक वृत्तान्त वाचका पुढे ठेवतों, | ज्या शब्दास व्यय म्हणजे विकार होत नाही, त्यास अव्यय अशी संज्ञा आहे. अर्थात्, नामास विभक्तांचे प्रत्यय लागल्याने विकार होतो, आणि धातूस आख्यात. रूप विकार होतो. परंतु, लवकर, आज, ताबडतोब, इत्यादि शब्दांस कांहींच विकार होत नाहीं; व यासाठीच त्यांस अव्यय अथवा अविकारी शब्द म्हणतात.