व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३६५ कारणासाठी प्रत्ययच ह्मणतो, ते वर्ण पूर्वी अगदी स्वतंत्र शब्दच असल्याचे दिसते. मात्र, अन्य शब्दाशी त्यांचा निरंतर संधि होत गेल्याने, त्यांच्या कियक अवयवांचा लोप होऊन, त्यांचे प्रथमचे स्वातंत्र्य नष्ट झाले असावे, असे मानण्यास बलवत्तर कारण मिळते. ह्या गोष्टीचे प्रयन्तर पाहण्यासाठी, आपण क्षणभर पार्श्व शब्दाकडे वळं, आणि याचे * त्यांचे सविभक्ति- स्थित्यंतर पाहू. हा शब्द मूळचा कत्व. | संस्कृत असून, त्याचा अर्थ बाजू असा होतो. वाल भाषेतील ‘पस्स' शब्द याचाच अपभ्रंश होय; व ह्याचेच आणखी थोडेसे रूपान्तर होऊन, पास ( आसपास, पाशी, ) असा मराठींत शब्द झाला आहे. मात्र, बालभाषेतून मराठीत रूपान्तर होतांना, एक दर नियमाप्रमाणे, त्यांतला पहिला स्वर दीर्घ झाला, व संयुक्त व्यंजनांतील एक व्यंजन गळून गेले. असो. ह्या पास शब्दासच, 'ई' आणि 'ऊन' हे सप्तमीचे व पंचमीचे जुने प्रत्यय लागून, त्याचेच ‘पाशीं' आणि 'पासून ' हे शब्द झाले आहेत. अर्थात् , पास ह्या प्रातिपदिकाला 'ई' व 'ऊन' हे प्रत्यय लागले; आणि ह्मणूनच ‘पाशी' व 'पासून ', हे सविभक्तिक शब्द झाले, असे ह्मणणे प्राप्त येते. परंतु, अशा प्रकारची खरी वस्तुस्थिति असतांही, ‘पाशी' व 'पासून ' हे सविभक्तिक शब्द आहेत, असे फारच थोडे लोक समजत असतील, अशी आमची अल्प समजूत आहे. फार तर काय सांगावे, पण, ह्या शब्दांस प्रायः प्रत्यय किंवा अव्य
पान:भाषाशास्त्र.djvu/374
Appearance