पान:भाषाशास्त्र.djvu/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३५३ होण्यास साधन मिळते; तोच शब्द होय, असे वाचकाच्या लक्षांत सहज आले असेल. असो. हा शब्द स्वयमेय सिद्ध असतो, किंवा तो धातुपासून उत्पन्न होतो, याविषयी आमच्या भारतीय भाषाभिज्ञांत पुष्कळच भवात न भवति झाली असून, पौरस्त्य व पाश्चात्य पंडितांत सुद्धां तद्विषयक विलक्षण मतभेद असल्याचे दिसते. ह्या सबंधाची चर्चा इतकी महत्वाची आहे की, त्याबद्दलचे जेवढे ह्मणून वर्णन करावे तेवढे थोडे. इतकेच नव्हे तर, विषयगुरुत्वाप्रमाणे त्याची उपयुक्तता देखील निःसंशय ज्यास्त आहे, ही गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. सबब, त्याबद्दलची साद्यन्त हकीकत येथे यथावकाश देतो. शब्दाचे मूळरूप कोणते, याविषयी आमच्या भारतीय भाषाको विदांत बराच मतभेद असशाकटायनादींचा त्यामुळे, त्यांत अर्थातच दोन पक्ष व्युत्पत्तपक्ष. झाले आहेत. नैरुक्त, शब्दव्युत्पत्तिशास्त्रज्ञ, आणि शाकटायनादि वैयाकरण, हे एका बाजूला असन, ते असे प्रतिपादन करतात की, यच्चावत् नाममात्र धातूपासूनच झाले आहे. ( मागील पृष्टांवरून पुढे चालू ) अभिप्रायाप्रमाणे ते २६ असून, वेदान्ती तर ते फक्त दोनच असल्याचे समजतात. । पदार्थाचें (षड्दर्शनासहित) तपाशलवार विवेचन भारतीय सा = पर्वार्धातल्या चवथ्या पुस्तकांत, आम्ही केले आहे. (पान ४० ते ६५ पहा. ). ग्रंथकत. म्राज्याच