१८२ , भाषाशास्त्र, जरी प्रथमदर्शनीं बिलकुल महत्वाची वाटत नाही, तरी त्या संबंधानें जरा सूक्ष्म विचार केला म्हणजे, गेलेला प्राचीन काळ हल्लीच्या अर्वाचीनकाळी देखील प्रत्यक्ष दृष्टिगोचर झाला, असे भासते. इतकेच नव्हे तर, तत्कालीन प्राचीन शब्द अर्वाचीन शब्दांप्रमाणेच अजूनही प्रचारांत आहेत, असे अनुमान होऊन, सदरहू शब्द आर्यकुलोत्पन्न शाखांतच वापरते असल्यामुळे, ते सुप्रसिद्ध पुराण आर्यलोक पूर्वनिवासस्थानांतच जणु काय पुनश्च अवतरून देशान्तरी गेले, असे वाटते. | आशियाखंडाच्या उत्तरेस, व अक्षया नदीच्या पलीकडे सिथियन भाषेत, 4 अश्व' शब्दाचा * अस्प असा अपभ्रंश होऊन, ६ स्वर्गाचे ' * स्पर्ग' असे रूपान्तर झाले आहे; आणि * पती ' चे 44 पिथिस बनले आहे. आतां, आपण क्षणभर आफ्रिकाखंडाकडे आपली दृष्टि फेकू, आणि तेथे अनेक आर्य शआफ्रिकाखडाताल = तीन तेज कितीसे फांकले आहy आर्यांच्या वसाहती, हे पाहूं. * युरोपखंडापेक्षाही आफ्रिकाखंडांत आमच्या वसाहती फार लवकर गेल्या असल्याचे दिसते. कारण, भरतखंडांत, म्हणजे आमच्या जन्मभूमीत, आर्य पूर्वजांनी चोहों दिशांनी आपले राज्य विसृत केल्यावर, त्यांचे बाहू स्फुरण पावू लागले. त्यामुळे, त्यांचे साहस सहजच वाढून, ते सिंधु नदीच्या मुखाने हिन्दी महासागरांत उतरले; आणि तेथून, त्यांनी आपली जहाजें पूर्व,दक्षिण, व पश्चिम दिशेकडे हांकारलीं, अर्थात्, कित्येक सुमात्रा, जाव्हा, इत्यादि ठिकाण १ भारतीय सामाज्य, पूर्वार्ध. पु. ६ वें. भाग ३७ वा पहा. । ६
पान:भाषाशास्त्र.djvu/189
Appearance