पान:भाषाशास्त्र.djvu/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० | भाषाशास्त्र. ज्यांनी म्हणून आपला सनातन धर्म सोडला, ते पतित होऊन भ्रष्ट झाले. इतकेच नव्हे तर, ते आमची भरतभूमी सोडून देशान्तरी गेले. त्यामुळे, त्यांच्या त्या भिन्न भिन्न अवस्थांत आणि नानाविध स्थितींत, अनेक व अतयं परिवेष्टनांनी हरएक बाबतीत फरक होत जाऊन, त्यांच्या मूळच्या प्रचारांत, आणि विशेषतः भाषेत महदन्तर पडत चालले. ५. ह्याचा प्रत्यक्ष दाखला आमच्या पारसीक बंधूचाच तद्विषयक प्रमाण. होय. हे व आम्ही अगदी नजीकचे गोत्रज असतांही, फक्त धमाच्या बाबतीतच त्यांचा आणि आमचा लढा पडल्या कारणाने, त्यांजला खरोखरच देशत्याग करून, शेवटी इराणांत राहणे भाग पडलें. , ह्या संबंधाने विष्णुपुराणांत देखील एके ठिकाणी | महत्वाचा उल्लेख आहे. सबब, तो विष्णुपुराणांतले. येथे नमुद करतो. तेच निजधर्मपरित्यागद् ब्राह्मणैश्च परित्यक्ता म्लेच्छतां ययुः। ( विष्णुपुराण ४. ३. २१ ). याहीपेक्षां प्राचीनतर प्रमाण मनुस्मृतींतले असून, | तींत देखील असे सांगितले आहे की, "रातः स्वकर्म त्याग आणि क्रियालोप झाल्या मुळे, आर्यवर्गातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, इत्यादि जातींस हीनत्व येऊन, ते कालान्तराने शक, यवन, चिनी, किरात, वगैरे बनले. | १ एताद्वषयक साद्यन्त माहिती भारतीय साम्राज्याच्या सातव्या पुस्तकांत दिली आहे. ( भाग ४० पान १०५ ते ११० पहा. )