भाषेचे उद्गमस्थान. १५१ आमची जन्मभूमि जे आर्यावर्त, तेथेच आमचा उदय होऊन, आमचे बाहू स्फुरण पावल्यावर, आम्ही आपल्या वसाहती चाहोंकडे वसविल्या; आणि कालान्तराने मिसरदेशांत जाऊन, तोही देश सर केला, व तो आर्यमाम्रा ज्यास जोडला. पुढे, हा आमच्या साम्राज्याचा एक प्रांतच बनल्यामुळे, आह्मी तेथे आपली वर्णसंस्था सुरू केली; आणि आमच्या व्यावहारिक संस्कृतभाषेतच तेथील जित प्रजेस योग्य शिक्षण देऊन, सवाँसच ज्ञान'मृत पाजिलें. त्यामुळे, अर्थात्च, संस्कृत भाषेचा मिसर देशांत सार्वत्रिक प्रसार झाला; व आमची वस्ती जसजशी वाढू लागली, आणि आमच्या साहसास ज्या मानाने प्रोत्साहन मिळालें, त्या मानाने आह्मी देशान्तरी जाऊन वस्ती केली, व ग्रीस इतली, इयादि देशांत जाऊन राहिलो. या योगाने, उघडच, आमचे आर्यकुटुंब फैलावले जाऊन, संस्कृत (झणजे वैदिक अर्थ ) भाषेच्याही अनेक शाखा उत्पन्न झाल्या. । असो, सदरहू विवेचनावरून, आमच्या आर्य संस्कृत भाषेचे पौराणत्व सिद्ध होऊन, तिचा मातृपदाचा बहुमान देखील सर्वानुमतें स्थापित झाल्याचे वाचकाच्या लक्षांत सहज येईल. १ इजिप्त ( मिसर ) देशांत आह्मा आर्यांची वसाहत असल्यावहुल अनेक प्रमाणांवरून दिसून येते. आमच्या आर्यवीरांपैकीं मन व राम नांवाच्या साहसी पुरुषांनीं तो देश जिंकिला; तेथे त्यांनी राज्य केलें; आणि आर्यधर्मही स्थापिला. ह्याच नामट्यांचा अपभ्रंश होऊन, मीनीस व रामॅसीसे ही राजांची नांवे त्या देशांत सुप्र. सिद्ध झाली आहेत. ( पुढील पान १५६-५७ वर लक्ष्य द्यावे. ) - ( Journal. R. A. S. vol. XVI 1854. पहा.)
पान:भाषाशास्त्र.djvu/160
Appearance