पान:भाषाशास्त्र.djvu/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ भाषाशास्त्र. लिहिले आहे. तथापि, यूक्लरप्रमाणे, हीकेलक्यास्पेरिया, पेस्चे, इत्यादींचे ही मत असल्याचे कळून येते. मात्र, अनेकभाषाकोविद, पौराणिक, प्राचीनवस्तुशास्त्रज्ञ, नृवंशवेत्ते, वगैरेंचा अभिप्राय याहून भिन्न आहे, व मानवी प्राण्याचा जन्मभूमि मध्यआशियांत, पामीरच्या उच्च पठारावर असल्याचे ते म्हणतात. क्वाटरफेजी नांवाचा एक सुप्रसिद्ध फ्रेंच नृवंशेतिहासज्ञ होऊन गेला. त्याचेही मत असेच असून, त्याने एके ठिकाणी असे लिहिले आहे की, । : This great Central region night be regarded as having included the Cradle of the human race

  • * * The three fundamental forms of human language are found in the same regions, and in an:alogous connections. * * * Lastly, it is from Asia, again, that our earliest tamed domestic animals have come. Isidore Geoffray Saint Hilaire is entirely agreed on this point, with Durcan de la Malle.” | ओ ब्रीचे मत सुद्धा अशाच प्रकारचे आहे, आणि मनुष्याची उत्पत्ति मध्य आशियांत झाली असावी, असे त्याच्या ग्रंथावरून व्यक्त होते. ।

तथापि, मानवी प्राण्याच्या जन्मभूमीविषयी आणखी ही उत्तर ध्रुवाचा प्र- एक नूतन कल्पना निघाली आहे. देश, व तत्संबंधी अ- सबब, तिचे ही अवश्य ते दिग्दर्शन ज्ञान, येथेच थोडक्यांत केले पाहिजे. ह्या | १ 'The Pediguee of man. २ Races of men. 3 'The FIuman Species. * Cradle of the Human Species.