पान:भाषाशास्त्र.djvu/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरस्वती प्रदेश. ११८ . भाषाशास्त्र. भरतखंडच आहे, असे सिद्धवत् मानणे बरोबर होणार नाहीं. यासाठी, ह्या शंकेचेही निरसन होण्याकरितां, ज्या ऋचेत भरतभूमीतील स्थलनिर्देश केला आहे, तीच ऋचा येथे नमुद करतो. , उताक्षतिभ्योऽवनीरविन्दः। (ऋ. वे. ६,६१,३ ) ही ऋचा सरस्वती नदीला अनुलक्षून असून, तीत असे म्हटले आहे की, (हे सरस्वति ) “तू मनुष्यासाठी, म्हणजे (आर्यांकरितां), । भूमि संपादन करून दिलीस." आतां, ही सरस्वती नदी उत्तरहिंदुस्थानांत असल्यामुळे, आयच्या जन्मभूमीविषयी शंका राहत नाही, आणि ह्या नदीच्या आसपासच्या प्रांतांतच ते उत्पन्न झाल्याबद्दल निर्विवाद ठरते. 3 ही सरस्वती नदी आर्यबालकांस उदकरूपी स्तनपान | तिचे स्तनपान. देऊन, त्यांचे सर्वतोपरि कल्याण करते, अशाविषयी आणखी ही एका ऋचेत वर्णन आहे. यस्तेस्तनःशशयोयोमयो भूर्येनविश्वापुष्यसिवायणि। योरत्नधावसुविद्यःसुत्रःसरस्वततामहधातवेकः ४९ (ऋ. वे.अ. २.अ. ३.व. २३. मं. १. अ. २२. सू. १६ ४.) भावार्थ-हे सरस्वति ! तुझा स्तन पूर्ण भरलेला असून, तो सुखदायक आहे. कारण, तो फार उदार असून, तो आम्हांला धन देतो, आणि आमची संपत्तीही वृद्धिंगत करतो. सबब, हाच स्थन आम्हांस प्यावयास दे. अर्थात्, तुझ्या कल्याणकारक पात्रांतून आम्हांला विपुल पाणी दे, असा ह्या ऋचेचा इंगितार्थ होय, हे उघड आहे. 1- 74 |