पान:भाषाशास्त्र.djvu/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ 11 भाषाशास्त्रः । मनोगत चांगल्या प्रकारे प्रदर्शित करता येतात, असे कोणाच्याही लक्षांत सहज येईल. तथापि, ह्या संबंधाने इतकेंही आणखी ज्यास्त लक्षांत ठविले पाहिजे की, उद्गार झणजे भाषा नव्हे; आणि ह्मणूनच केवळ उद्गारानी, किंवा फक्त मनोविकार प्रदशित केल्यानेच, सर्व कार्यभाग आटोपला; अथवा आपले एकंदर विचार व्यक्त करता आले; असे समजणे अगदी बरोबर होणार नाहीं. परंतु, कॉण्डिल्या वगैरेंचे असे मत आहे की, उद्गार | कॉण्डिल्याक वगैरें- हेच भाषेचे मूळबीज असून, ह्या बीचें मत, व भाषेची जात्मक पायावरच भाषारूपी वृक्ष वाउद्गारात्मक हाहोप- ढीस लागला. ह्यानें हर्डरच्या उपप पत्ति . । त्ताला हरताळ लावून, असे प्रतिपादन केले आहे की, मनुष्य हा प्राणिवर्गात सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे, त्याला आपले मनोगत प्रकट करण्यासाठी, पश्वादिकांच्या ध्वनींचे अनुकरण करण्याचे काडीमात्र देखील प्रयोजन नाही. तो रडतो, हंसतो, स्पंदतो, टाळ्या पिटतो, आणि आनन्दही प्रदर्शित करतो. सबब, ज्यापेक्षा हे विकार त्याला प्रदर्शित करता येतात, त्यापेक्षा मानवी प्राण्यांच्या भाषेचा हा ** ओनामा ' च होय. ही उद्गारात्मक उपपत्ति असल्याकारणाने, आपण तिला हाहोपपत्ति अशी संज्ञा देऊ. अशा प्रकारे, भाषेच्यासंबंधाने नानातव्हेच्या अनेक १ मॉक्समुलरने हिला पुः पुः असे नामधेय दिले आहे. अर्थात्, हिला इंग्रजीत ‘‘ Pooh Pooh theory " म्हणतात, हे वाचकास सहज कळेल. (मॉक्समुलरची भाषाविषयक व्याख्याने पहा.)