आर्याची शासनपद्धति.
४३
दंडाची मर्यादा.
त्याची मर्यादा एक हजार पणापर्यंत
आहे. ह्यापेक्षां तो जास्त असता
काम नये. मध्यम दंड म्हटला म्हणजे पांचशे पण होय.
हरएक जिन्नस जोखून देण्यासाठीं, ज्या तुला म्हणजे
तुलादि परीक्षण.
कांटे किंवा तराजू ठेविले असतील,
अथवा मापें आणि वजने राखलेली
असतील, तीं सर्व चोख असून तत्संबंधी लबाडी होऊ नये,
व प्रजावर्ग फसला जाऊं नये म्हणून, त्यांची वारंवार व
दर सहामाहीस सरकारांतून तपासणी होण्याविषयीं,
मनुस्मृतींत स्पष्ट उल्लेख आहे. त्याचप्रमाणे, इतर किर-
कोळ बाबतीतही थोडक्यांत व चांगले नियम सांगितले
आहेत; त्यावरून होतां होई तों गुन्हे न व्हावे एतदर्थ,
विशेष खबरदारी आणि योग्य बंदोबस्ताची तजवीज
झालेली असल्याचे उघड दिसतें.
१ कांही गोष्टींत धर्मबुद्धीनें अ-
साधारण अपवाद. नृत बोलल्यास दंड अगर पातक' नाहीं.
१ पणानां द्वे शते सार्धे प्रथमः साहसः स्मृतः ।
मध्यमः पंच विज्ञेयः सहस्रं त्वेव चोत्तमः ॥ १३८ ॥
२ तुलामानप्रतीमानं सर्वे च स्यात्सलक्षितम् ।
षट्सु षट्सु च मासेषु पुनरेव परीक्षयेत् ॥ ४०३॥
( म. स्मृ. अ. ८.)