४१
याविषयीं महदाश्चर्य वाटतें. आतां, कदाचित् कोणी
अशी कल्पना करील, किंवा आक्षेप आणील कीं, आ-
यचा फौजदारी कायदाचसा काय, पण तत्कालीन
इतर कायदे म्हणजे, दिवाणी व पुराव्याचा कायदा,
हे देखील रानटी अवस्थेतील आणि अनुदारच आहेत.
परंतु हें म्हणणें अगदीच निराधार होईल. कारण, मागील
लेखावरून, आणि पुढील विवेचनावरून असें खचित
सिद्धवत् भासेल कीं, फौजदारी कायद्याशिवाय इतर सर्व
बाबतीत हिंदूंचे पाऊल सुधारणेच्या सर्व शाखांत फारच
पुढे सरसावलेलें होतें, यांत संशय नाहीं.
फौजदारी कायद्यां-
तील शिक्षेचे प्रकार.
असो. फौजदारी कायद्यांत एकदंर
शिक्षेचे प्रकार खाली लिहिल्याप्रमाणें
दिसून येतात:-
१ देहदंडें. ( म्हणजे फांशीं देणें, अथवा अन्य
उपायांनी ठार मारणें ).
1 “ The laws for civil judicature are very superior
to the Penal Code, and, indeed, are much more
rational and matured than could well be expected of
so early an age,"
2. “ The law of evidence in many particulars
resembles that of England.
(Elphinstone's H. of India.)
P. P. 58-59.
३ म. स्मृ. भ. ९ श्लो. २३१.