पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग करून नेहमी आपलेंच मत खरें आहे, असे समजतात. कोलक सारख्या शोधक पंडिताचें मत देखील त्यांजला संमत नसतें; आणि तें खोटें आहे असे सिद्ध करण्यासही ते तयार नसतात. एतावता, केवळ आपल्या मताप्रमाणेंच कोणतीही गोष्ट शाबीद ठरविण्यास ते तत्पर असतात. आणि क्वचित् प्रसंगी ह्यांचीं निराधार मतें खोडून काढ- ण्यास कोणी तयार झाला तर, त्याला वेडा ठरवून, त्याच्यावर शिव्यांचा सूक्तअसूक्त भडिमार करण्यास देखील ते कधीही मागे पुढे पाहत नाहींत. प्रोफेसर रॉथचा वृथादर्प तर गगनांतच मावेनासा झाला. त्याचें असें म्हणणे आहे कीं, वेदार्थप्रकाशनार्थ आपल्यासारखे प रॉथ. १. “In short, with fantastical certainty he scrup- les about astronomical facts, and presents fantasti- cal facts with astronomical certainty. I doubt whether this critical method will strengthen the faith of the general public in certain results of Sanskrit philology.' (Goldstucker on Panini. P. 77). २ हा प्रसंग खुद्द गोल्ड्स्टकर यांजवरच गुजरलेला असल्यामुळे, प्रत्यक्ष त्यांचाच अनुभव त्यांच्याच मुखानें सांगतों. ते ह्मणतात, “Professor Weber, who is also in the service of Worterbuch, suddenly attacked me in this journal, nor, indeed, with any thing that deserves the name of argument, but with personal abuse of the coarsest kind," पुढे चालू.