पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा] वेद व वेदांगें. आमचे हिंदुलोक व त्यांचे संस्कृत ग्रंथसमूह अतिपुरातन आहेत असे उघड होतें. आणि आतां दिवसानुदिवस, सर्व देशांतील संस्कृतज्ञांची अशी बालंबाल खात्री होत चालली आहे कीं, वेदांइतका पुराण ग्रंथ पृथिवीच्या पाठीवर दुसरीकडे कोठेंही नाहीं. ● आतां वेदांचा कसा व किती उपयोग आहे यावि- षयीं थोडा विचार करूं. एकतर खुद्द आम्हांसच त्या वेद- वेदांचा ऐतिहासिक रूपी इतिहासाचा अमूल्य उपयोग दृष्टीनें अमूल्य उपयोग. आहे. आणि दुसरें असें कीं, जितक्या अंशाने आम्हांस त्या अतिप्राचीन इतिहासाचा उपयोग आहे, तितक्याच अंशानें अखिल जगासही त्याचा अवर्णनीय उपयोग आहे. कारण कीं, सर्व जगांत वेद हेच अति पुराण लेख असल्यामुळे, मानवी कुटुंबाच्या मूलस्थितींतील अथपासून इतिपर्यंतची समग्र माहिती उपलब्ध होण्यास दुसरे कोणतेही साधन नाहीं, अथवा अन्य कोणताही मार्ग नाहीं. सर्वांचें आदि- मूलच वेद असल्यामुळे, मनुष्यमात्राचे प्रथमावस्थेतील मनोधर्म यावरूनच समजतात. त्यांचे आचारविचार यावरू- नच कळतात. आणि त्यांचे परस्पर व्यवहार, व त्यांचें परिशीलन, यांचें समर्पक ज्ञान यावरूनच होतें. इतकेच नाही तर, ते आज हजारों वर्गीमार्गे कसे बोलत चालत होते, व कसे वागत होते, याचें प्रत्यक्ष चित्रच १२