Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ भारतीय साम्राज्य. [ भाग त्यांनी प्रथम सत्तावीस नक्षत्रें शोधून काढली. याविषयीं सत्तावीस नक्षत्रें. ऋक्संहिता, तैत्तिरीय संहिता, अथर्वसंहिता, आणि तैत्तिरीय ब्रा- ह्मण, यांत उल्लेख आढळतो. ह्याच नक्षत्रांचें पुढे चिनी व आरवी लोकांनी अनुकरण केले. तदनंतर सूर्याचें सदैव आकर्षण पृथिवीवर आहे, हा सर्वमान्य सिद्धान्त त्यांनीच शो- धून काढला. ह्याचं प्रमाण श्रुतींत, ऋक्संहितेच्या तिसऱ्या अष्टकांत चवथ्या अध्यायाच्या पांचव्या वर्गात, सांपडतें:- मित्रोजना॑न्यतयतिब्रुवाणो मित्रोदाधारपृथिवी मुतद्यां । मि॒ित्रःकृ॒ष्टीरनि॑िमषा॒ाभिच॑ष्टेमि॒त्राय॑ह॒व्य॑घृ॒त व॑ज्जुहोत || ह्या ऋचेचा तात्पर्यार्थ असा आहे कीं, सर्व प्रजेला मि त्राचा म्हणजे सूर्याचाच आधार असून, तो पृथिवीला आपल्याकडेसच आकर्षण करतो; आणि ह्या त्याच्या आकर्षणांतून ती निमिषमात्रही सुटत नाहीं. सदरहू शोधानंतर कांहीं कालानें, अत्रि नामक ऋषीनें ग्रहण कसें लागतें याविषयी प्रथम शोध लाविला. सूर्याचें आकर्षण. अत्रिःसूर्यस्यदिविचक्षुराधात्स्वर्भानोरमायाऽ अयु॑क्षत् ॥ यं वै सूर्ये स्व॑नु॒स्तमसा विध्यसुरः । अत्र॑यस्तमन्त्रं वंदन्नश्च॑ऽन्येऽअशक्नुवन् || ऋक्संहिता. अष्टक ४. अध्याय २. वर्ग ८.