२१वा ] वेदान्तशास्त्र. कस्माद्भूयो न चायाति बंधुस्नेहसमाकूलः ॥ ७ ॥ ततश्व जीवनोपायो ब्राह्मणैर्विहितात्स्व | मृतानां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित् ॥ ८ ॥ त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्त निशाचराः | जर्फ (र्भ) री तुर्फरीत्यादि पंडितानां वचः स्मृतम् ॥ ९॥ अश्वस्यात्र हि शिस्नं तु पत्नीग्राह्यं प्रकीर्तितम् । भंडैस्तद्वत् परं चैव ग्राह्यजातं प्रकीर्तितम् ॥ १० ॥ मांसानां खादनं तद्वन्निशाचरसमीरितम्” इत्यादि । चार्वाकाचें जन्म अवंती देशांत, क्षिप्रा व चमला ह्या नद्यांच्या संगमावर शंखोद्धार नामक क्षेत्रांत झाले. त्याच्या बा पाचे नांव इंदुकांत व आईचें नांव सृग्विणी असे असून, तो होऊन गेल्याला सुमारे अडीच हजार वर्षांवर वर्षे झाली असावी असे अनुमान आहे. बौद्ध धर्माचें मूळ चार सिद्धान्त आहेत. ते हे कीं:- १ सर्वे क्षणिकं क्षणिकम् २ सर्वे दुःखं दुःखम् ३ सर्व स्वलक्षणं स्वलक्षणम्. व ४ सर्वे शून्यं शून्यम्. ह्या चार सिद्धा- न्तांस भावना अशी संज्ञा असून, १ सर्वशून्यत्व; २ बाह्य शून्यत्व; ३ बाह्यार्थानुमेयत्व; आणि ४ बाह्यार्थ प्रत्यक्षत्व; असे चार प्रकारचे वाद मानले आहेत. एकं- दरीत है जगत् क्षणिक, दुःखरूप, स्वलक्षण, आणि शून्य, योद्धमतसिद्धान्त. ६ चाबकाची जन्म- भूमि, व काल.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/७४
Appearance