२१वा ] वेदान्तशास्त्र. धर्म निरूपण; ७ गुणसमवाय निरूपण; ८ निर्विकल्पसवि- कल्पप्रामाण्यव्यवस्थानिरूपण; ९ बुद्धि निरूपण; आणि १० अनुमान भेद निरूपण. ह्या दर्शनांत एकंदर सहा पदार्थ मानिले आहेत. १ द्रव्य, २ गुण, ३ कर्म, ४ सामान्य, ५ विशेष, आणि ६ समवाय. हे सर्व भावपदार्थ असून, ७ सातवा पदार्थ जो अभाव तोही कणादाला संमत असल्याविषयीं पंडि- तांची कल्पना आहे. द्रव्याचे नऊ प्रकार आहेत. १ पृथ्वी, २. जल, ३ तेज, ४ वायु, ५ आकाश, ६ काल, ७ दिशा, ८ आत्मा, आणि ९ मन किंवा अंतःकरण. गुणाचे चोवीस भेद सांगितले आहेत. १ रूप. २ रस. ३ गंध. ४ स्पर्श. ५ संख्या ६ परिणाम. ७ पृथक्त्व. ८ संयोग. ९ विभाग. १० परत्व ११ अपरत्व. १२ गुरुत्व. १३ द्रवत्व १४ स्नेह. १५ शब्द. १६ बुद्धि. १७ सुख. १८ दुःख. १९ इच्छा. २० द्वेष. २१ प्रयत्न. २२ धर्म २३ अधर्म. आणि २४ संस्कार. कर्माचे पांच भेद आहेत. १ उत्क्षेपण. २ अपक्षेण. ३ आकुंचन. ४ प्रसरण आणि ५ गमन. सामान्य किंवा जाति याचे दोन भेद आहेत. १ परसामा- न्य, ह्यणजे द्रव्यत्व; आणि २ अपरसामान्य, ह्मणजे पृथ्वी. आतां, “विशेष” या पदार्थाचें संक्षेपतः निरूपण असें आहे कीं, आकाश आणि परमाणु इत्यादि द्रव्यें नित्य, ह्मणजे वैशेषिकदर्शनाची मूलतत्त्वें.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/६४
Appearance