Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ भारतीय साम्राज्य. [ भाग शेरिंग ह्मणतो कीं, ब्राम्हणाचें तें स्वयमेव श्रेष्ठत्व, त्याच्या रक्तांत अगदर्दी खिळून गेलेले असे त्याचें वर्चस्व, त्याचे ते सतेज नेत्र, त्याचें विशाल भाल, त्याचा निमगो- रावर्ण, मनांत भरणारा असा त्याचा चेहेरा, त्याची ती व्यंजक मुद्रा, त्याचें तें भारदस्त गमन, त्याच्या शरीरांत मुसमुसलेला त्याचा मानीपणा व प्रागल्भ्य, इत्यादि पाहून, हा ह्या पृथिवीवरील एक अलौकिक प्राणी आहे असे वाटतें. ब्राह्मणांनीं वेदाध्ययन चान्ही आश्रमांत सतत केलेच पाहिजे, अशी मन्वाज्ञा आहे. चाही आश्रमांत वेदाध्ययन करण्या- विषयी आज्ञा. वेदमेवसदाभ्यसे तपस्तप्स्यन्द्विजोत्तमः । वेदाभ्यासोहिविप्रस्यतपः परमिहोच्यते ॥ १६६ ॥ ( मनुस्मृति. अध्याय २. ब्रह्मचर्य ) thin and mouth 1. " Light of complexion, his forehead ample, his countenance of striking significance, his lips expressive, his eyes quick and sharp, his fingers long, his carriage noble and almost sublime, the true Brahmin, uncontaminated by any European influence and manners, with his intense self consciousness, with the proud conviction of superiority, depicted in every muscle of his face, and manifest in every movement of his body, is a wonderful specimen of humanity walking on God's Earth. " (Sherring's Hindu Tribes and castes. )