२२ भारतीय साम्राज्य. [ भाग स्मश्रु, हीं नेहेमीं काढली पाहिजेत. धातुपात्र न घेतां, भोपळा, काष्टपात्र, मृत्पात्र, किंवा तरुत्वनिर्मितपात्र, हींच सदैव ग्रहण करून त्यांत भिक्षा मागितली पाहिजे. कारण, धातुपात्रांत भिक्षा घेतली असतां नरकपतनाची भीति सांगितली आहे. तसेच हातांत दण्डधारण करून, कोणाही भूतास पीडा न करतां परिभ्रमण केले पाहिजे. अल्प आहार करून एकभुक्त असले पाहिजे. आणि इन्द्रियांचें दमन करून नेहेमीं प्राणायाम केला पाहिजे. याप्रमाणें सदरीं लिहिलेल्या आश्रमचतुष्टयांतील कर्म- विधि जरी अति कठिण आहे, तरी तो शास्त्रोक्त असल्यामुळे, व आम- च्या लोकांची आमच्या धर्मावर अति श्रद्धा असल्या कारणानें, पूर्वीच्या काळीं तो मनःपूर्वक सर्व आचरीत. इतकेंच नाहीं तर, हल्लींच्या सुधार- लेल्या एकोणिसाव्या शतकांतही, त्यांचें अवलंबन करणारे कांहीं गृहस्थ सांपडतील, असें प्रत्यक्षानुभवावरून कोणाही जिज्ञासूला आपल्या मनाची खात्री करून घेतां येईल. ब्राम्हणांचें हें आश्रमचतुष्टय, त्यांचें तें जितेन्द्रियत्व, त्यांची ती विद्यापरायणता, त्यांचें सोज्वळ आत्मज्ञान, आणि त्यांची अत्युत्कट संसारविरक्ति, हीं नेहेमी त्यांच्या येळ्यापुढेंच असतात, अर्से आतां जास्त सांगण्याची अव आश्रम चतुष्टयांचें पालन, व तत्संचं- थीं वेदकालापासून आजपर्यंत एकसार- सी चालत आलेली स्थिति.
पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/३५
Appearance