पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२वा ]
भूमितिशास्त्र.

९७


त्याचें दिसतें. सूर्यसिध्दान्तांत भूमितिशास्त्राच्या संबंधानें

जे सिधान्त त्यांनी स्थापित केले

त्यांचें भूमितिशास्त्र. आहेत, त्यावरून इसवी शका- च्या पांचव्या आणि सहाव्या शतकांतही हिंदूंचें तत्संबंधी ज्ञान फारच विकासाप्रत पावले असून, त्याचा यत्किचित् गंधही ग्रीक लोकांस त्यावेळीं नव्हता. इतकेंच नाहीं तर, त्यांत प्रतिपादन केलेल्या सिधान्तांचा शोध यूरोपखंडांत कोठेंच सोळाव्या शतकापर्यंतही झाला नव्हता, हे निर्विवाद आहे. त्रिकोणाचे धर्म, त्याच्या तीन बाजूच्या प्रमाणांनी सिद्ध झालेले क्षेत्रफळ, आणि परिधि व त्रिज्या यांचे परस्पर प्रमाण, याविषयीं सूर्यसिद्धान्तांत जे जे शोध हिंदूनीं केले, त्यांत त्यांचे विशेष नैपुण्य दिसून येतें. आणि ह्या शास्त्रांतही त्यांचें पाऊल इतरे राष्ट्रापेक्षां


( मागील पृष्ठावरून पुढे चालू )

than in astronomy. In the "Surya sidhanta,” * * * is contained a system of Trigonometry, which not only goes far beyond anything known to the Greeks, but involves theorems which were not discovered in Europe till the sixteenth century."
 1 “ Their Geometrical skill is shown, among other forms, by their demonstrations of various pro- perties of triangles, especially one which expresses the area in the terms of the three sides, and was un- known in Europe till published by Clavius ( in the sixteenth Century ) ; and by their knowledge of the

( पुढे चालू )