Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२वा ] ज्योतिःशास्त्र. सिद्ध पुरुष होऊन गेले; व त्यांचेंच मत सर्व युरो- पखंडांत त्यावेळीं, व त्यानंतर इसवी शकाच्या पंधराव्या शतकापर्यंत प्रचारांत होतें. पृथिवी अचल असून तिच्या सभोंवतीं सूर्य व इतर ग्रह फिरतात, हेच त्यांच्या मताचें मूलबीज होय. आरिस्टॉटलचा शिवाय असाही सिद्धान्त होता कीं, एक जड आणि एक हलका असे एका जातीचें दोन पदार्थ सारख्या उंचीवरून एकदम सोडिले, तर जड पदार्थाचें वजन हलक्या पदार्थापेक्षां नितकें अधिक असेल, तितक्या प्रमाणानें तो जड पदार्थ हलक्या पदार्थापूर्वी भूमीवर पडेल. आतां, आमच्या अतिप्राचीन हिंदु ज्योतिः- सिद्धान्ताशीं ह्या यावनिक सिद्धान्तांची तुलना करून पा हिली तर, हे यावनिक सिद्धान्त किती बालिश आणि खरेपणापासून दूर आ हेत, हें जास्त सांगावयास नको. हीं ग्रीक लोकांची वेडगळ मतें, थेट गेल्या पंधराव्या शतका- पर्यंत, यूरोपखंडांत सर्वत्र प्रचारांत होतीं. त्यांच्या मताचें मिथ्यत्व. o ह्या मतांत बदल होण्याला पुष्कळ कारणे झाली. इ० स० १४७३ सालीं, प्रशिया देशांत कोपर्निकस नामक विद्वान गृहस्थ, यान् या गांवांत जन्मला. त्याला लहान पणापासून गणितविद्या फारच आवडत असल्यामुळे, तो ती मोठ्या उत्साहानें शिकला, व त्यानें शिवाय ज्योतिः- त्यांत बदल होण्या- चीं कारण.