पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(0) ऋग्वेदज्योतिष वसंवत्सरमयं येगाध्यक्ष प्रजापति ।। दिनवयनमासांगं प्रणम्य शिरसा शुचिः ॥ २ ॥ भणम्य शिरसा कालमभिवाय सरस्वती ॥ कालज्ञानं प्रवक्ष्यामि लगधस्य महात्मनः ॥ २ ॥ अथ-दिवस, ऋतु, अयन, मास ही आहेत अंगें ज्याची असा पंचसंवत्सरमय युगाध्यक्ष जो प्रजापति त्यास नमस्कार करून शुद्ध होत्साता [ मी] कालास शिरसा नमस्कार करून आणि सरस्वतीस अभिवंदन करून महात्मा जो लगध याचे कालज्ञान सांगतो. ।। 1 ।।२।। पंचवर्षात्मक युगाच्या पांच संवत्सरांची नांवें वेदांगज्योतिषांत आली नाहीत हे अमट सें आश्चर्यकारक आहे. परंतु सोमाकराने दिलेली कांहीं गर्गवचनें पुढे ८ व्या श्लोकावरील विचारांत दिली आहेत त्यांत पंचसंवत्सरात्मक युगाचे स्वरूप काहींसें आले आहे, ते वेदांगज्योतिषांतल्यासारखेच आहे. त्यांत पांच नांवें आली आहेत. वराहमिहिराने बृहत्संहितेंत संवत्सरांची नावे आणि अधिप ही दिली आहेत. (बृ. सं. ८. १०). त्यांतले कांहीं आधिप गर्गाच्या आधिपाहून भिन्न आहेत. तैत्तिरीयब्राह्मणांतले एक वाक्य पूर्वी दिले आहे, (पृ. २७). त्यांत संवत्सरांचे आधिप आहेत असें ह्मणण्यास हरकत नाही. परंतु ते चारच आहेत व ते काहीसे भिन्न आहेत. ते सर्व खाली देतो. संवत्सरनाम स्वामि ते. ब्राह्म. गर्ग वराह १ संवत्सर अग्नि अग्नि अग्नि २ परिवत्सर आदित्य आदित्य आदित्य ३ इदावत्सर चंद्रमा वायु चंद्रमा ४ अनुवत्सर वायु चंद्रमा प्रजापति ५ इद्वत्सर मृत्यु निरेकं द्वादशार्धाब्दं द्विगुणं गतसंज्ञिकं ॥ षष्ट्या षष्ट्या युतं द्वाभ्यां पर्वणां राशिरुच्यते ॥ ४ ॥ यांतील पाठांतील " द्वादशाब्दिं " आणि “ संज्ञिकं " याबद्दल "द्वादशाभ्यस्तं " आणि "संयुतं " हे यजुःपाठ घेऊन अर्थ लागतो. अर्थ-[पंचसंवत्सरात्मक युगांतील वर्तमान संवत्सराची संख्या ] निरेक करावी. बारांनी गुणावी. गत [ पास ] युक्त करावी. द्विगुण करावी. प्रत्येक साठांस दोहोंनी युक्त करावी. [ बेरजेस ] पर्वांचा राशि ह्मणतात. ॥ ४ ॥ उदाहरण-युगांतल्या दुस-या वर्षाच्या आरंभी पर्वसंख्या काढणे तर गतवत्सर १ ह्मणून १x१२४२=२४ ही पर्वसंख्या झाली. तिस-या वर्षाच्या सातव्या मासाच्या अंती पर्वसंख्या ( २४१२+७) २+२=६४. करणग्रंथांत आरंभी अहर्गण करावा लागतो, त्याप्रमाणेच हे आहे. साठ पर्वे ह्मणजे ३० चांद्रमास झाल्यावर एक अधिकमास येतो असें यावरून दिसून येते. पाठांतील इतर काही श्लोकांवरूनही तसे अनुमान निघते. यजुःपाठ श्लोक ३७ यांत तसे स्पष्ट सांगितले आहे. स्वरार्कमेके सोमार्को यदा साकं सवासवौ ।। स्यात्तदादियगं माघस्तपः शुक्लो दिनंत्यजः ॥ ५ ॥ यजुःपाठःस्वराक्रमेते सोमार्को यदा साकं सवासवौ ॥ स्याचदादियुग माघस्तपः शुक्लोयनंादक ॥ १०