पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) ग्रंथात आहे तो पुढे दिला आहे. हा ग्रंथ प्राचीन ह्मणून ज्योतिःशास्त्राच्या इतिहासांत याची योग्यता फार आहे; म्हणून त्याचा विचार अवश्य केला पाहिजे. प्रो० थीबो याने इ. स. १८७९ च्या सुमारे यजुर्वेदज्योतिषाचे भाषांतर व त्यावर विचार केला आहे; त्याचें एक लहानसें पुस्तक छापले आहे. सोमाकराने लावल्यापेक्षां थीबो यास सुमारे ६ श्लोक जास्त लागले आहेत. इ. स. १८८१ मध्ये यजुर्वेदज्योतिषाचे जितके श्लोक लागले तितक्यांचे मराठी भापातर मी केले होते. कै. वा. कृष्णशास्त्री गोडबोले यांनी हे ज्योतिष लावण्याचा यत्न केला होता, परंतु त्यांसही थीबोपेक्षा जास्त श्लोक लागले असें दिसत नाही. कै. वा० जनार्दन बाळाजी मोडक बी. ए. यांनी ऋग्वेदज्योतिष आणि यजुर्वेदज्योतिष यांचे महाराष्ट्र भाषांतर इ. स. १८८५ साली छापले आहे. प्रो० थीबोच्या पुस्तकापेक्षां यांत २।३ श्लोक जास्त लागले आहेत. ह्मणजे दोन्ही ज्योतिषांमिळून ४९ पैकी २८ लागले आहेत. हल्ली मला ४९ पैकी ३६ श्लोक लागले आहेत. ऋग्वेदज्योतिष मात्र सांप्रत ब्राम्हण म्हणतात. यजुर्वेदज्योतिष सगळ्या भरतखडांत एकाद्या प्रांतांतले ब्राम्हण पाठ करितात असें प्रसिद्ध नाही. पूर्वी तरी कधी त्याचें अध्ययन करीत होते की नाही नकळे. वेदांगज्योतिष सांप्रत जें वैदिकांच्या पाठांत आहे, त्याविषयी एक मोठा चमत्कार आहे. तो असा की अर्थाकडे लक्ष्य दिले तर वैदिकांच्या पाठांतल्या पुष्कळ श्लोकांत कांहीं कांहीं अशुढे आहेत. आणि असें असून सगळ्या देशभर सर्व ब्राह्मणांच्या तोंडी पाठ एक! आणि अशा ह्या पाठाची योग्यता साक्षात् वेदाप्रमाणेच वैदिक मानितात हे सांगण्यास नकोच. कोणी मटलें की अमुक शब्द अशुद्ध आहे तो टाकून त्या स्थळी तो अमुक प्रकारे ह्मणा; तर तें ह्मणणे कोणीच मान्य करणार नाही. हे ज्योतिष मूळ जेव्हां प्रवृत्त झाले तेव्हां ते अशुद्ध नसेल हे उघडच आहे. मग अशुद्धे केव्हां आणि कशी शिरली या गोटीचा शोध वेद आणि वेदांगे यांच्या अध्ययनाच्या इतिहासांत फार महत्वाचा होईल. मूळ वेदांगज्योतिषाचा केव्हां तरी प्रायः लोप झाला असावा. पुढे केव्हां तरी कोणाच्या संग्रही असलेल्या अशुद्ध किंवा वाचण्यास कठीण अशा एकाद्या लिहिलेल्या पुस्तकावरून त्याचें अध्ययन अर्थ न जाणणान्या अशा कोणी तरी प्रथम सुरू केले असावें. आणि तेच पुढे सर्वांच्या प्रचारांत आले असावे असे दिसते. इतर कोणत्याही वेदवेदांगाची अशी स्थिति नाही. तेव्हां संस्कृतवाङ्मयेतिहासशोधकांनी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. मला यासंबंधे कांहीं श्लोकांबद्दल जें दिसून आलें तें पुढें लिहिले आहे. वेदांगपिकी व्याकरण पाणिनीचें, छंदःशास्त्राचा आचार्य पिंगल, तसा ऋग्वेदज्योतिषाचा आचार्य लगध हा होय. या ज्योतिषाच्या दुसन्या श्लोकांत “लगधाचें कालज्ञान सांगतों" असें झटले आहे. अष्टाध्यायीच्या आरंभापूर्वी दोन श्लोक ह्मणत असतात. त्यांत पाणिनीचें वंदन आहे. तसाच हा प्रकार दिसतो. कदाचित् सर्वच वेदांगज्योतिष साक्षात् लगधोक्त नसेल. लगधाच्या मताप्रमाणे पुढे कोणी त्याची रचना केली असेल. लगध हे नांव युरोपिअन लोकलगड किंवा लगढ असेंही ह्मणतात. परंतु हा घोंटाळा ध हे अक्षर रोमनलिपीत बरोबर लिहितां येत नाहीं यामुळे झालेला दिसतो. आणि यामुळेच प्रो० वेबर यांणे लगड हा लाट असेल तर तो इ. स. च्या ५ व्या शतकांत येतो असा