पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून कांहीं आकाशस्थ पदाथांस 'ग्रह ही संज्ञा अथर्वसंहिताकाली लावू लागले होते हे उघड आहे. 'राहूसह चांद्रमसग्रह आणि आदित्यग्रह कल्याणदायक होवोत' असें मटले आहे, तें चंद्रसूर्यास ग्रहण लावणान्या ग्रहांस उद्देशन आहे असे दिसते. आणि याशिवाय पुनः 'दिविचर ग्रह कल्याण होवोत ' असें म्हटले आहे, ते शुक्रादि ग्रहांसच अनुलक्षून असावें. हिंदूंनी नक्षत्रे देखील बाबिलोनिअन लोकांपासून घेतली असें म्हणणारा जर्मन प्रो० वेबर म्हणतो की हिंदूंनी ग्रह स्वतंत्रपणे शोधून काढिले असें ग्रहांच्या नांवांवरून दिसते.* एकंदरीत मला वाटते की, वेदकालीं बृहस्पति आणि शुक्र या ग्रहांचे ज्ञान भारतीयांस झालेले असावे. आणि हे जर खरे आहे तर कधी कधी बृहस्पतीइतका तेजस्वी दिसणारा मंगळ, नेहमी सूर्याजवळ दिसणारा बुध आणि मंदगति शनि यांचे ज्ञान त्या काळी होणे असंभवनीय नाही. अथर्वसंहितेतली वाक्ये ( १९.९) आतां दिली त्यांत उल्का आणि धूमकेतु आउल्का धमकेतले आहेत. उल्केनें एकाया नक्षत्राचे ताडन केले असतां त्याची काय फलें याविषयीं वराहमिहिराने बरेच सांगितले आहे. कोणतेही एकादें कत्य करण्यास चांगला मुहूर्त पाहिजे ही समजूत वेदकाली देशुभकाल. खील होती असे दिसून येते. स्तोतारं विप्रः सुदिनत्वे अन्हां यानुद्यावस्ततनन्यादुषासः ॥ क्र.सं. ७.८८.४. विप्र (मेधावी) [वरुण ], जाणारे दिवस आणि रात्रि यांस विस्तृत करीत होत्साता स्तोत्यास दिवसांच्या सुदिनत्वामध्ये [स्थापिता झाला]. अमुक नक्षत्रावर अन्याधान इत्यादि कृत्ये करावी अशी वचने तैत्तिरीय श्रुतींत पुष्कळच आली आहेत. त्यांतील काही वाक्ये इतर कारणाने वर आलीच आहेत. आणखी काही देतो. उदितेवु नक्षत्रेषु व्रतं कृणुतेति वाच विसृजति तै. सं.६.१.४.४. "नक्षत्रे उगवल्यावर.. मौन सोडतो." नक्षत्रदर्शन होईपर्यंत अमुक व्रत करावयाचे, नक्षत्रदर्शनी अमक्याची शुद्धि होते, इत्यादि प्रकार धर्मशास्त्रग्रंथात प्रसिद्ध आहेत. यः कामयेत दानकामा मे प्रजाः स्युरित ॥ स पूर्वयोः फल्गुन्योरग्निमादधीत ॥ अर्यम्णो वा एतनक्षत्रं ।। यत्पूर्व फल्गुनी । अर्यमेति तमाही ददाति ।। दानकामा अस्मै प्रजा भवंति ।। तै. बा. १.१. २. यान्येव देवनक्षत्राणि ॥ तेषु कति यत्कारीस्यात् ॥ पुण्याह एव कुरुते ॥ तै. बा. १. ५. २. यां कामयेत दुहितरं प्रियास्यादिति ॥ तां निष्टयायां दद्यात् ॥ प्रियैव भवति ॥ तै. बा. १.५. २. "कन्या [ पतीला ] प्रिय व्हावी अशी इच्छा असेल तर ती निट्या [स्वाती ] नक्षत्री द्यावी ह्मणजे प्रिय होते."

  • Weber's History of the Indian Literature p. 251.'