पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होय." सांप्रत आकाशात पाहिले असतां, या पुरुषाने हात मस्तकाच्या एका बाजूस वर केला आहे अशी कल्पना करून ही आरुति चांगली जमते. मात्र स्वाती हृदय हे जमत नाही. स्वाती तारेची निजगति (Proper motion) इतर तारांपेक्षा पुष्कळ जास्त आहे. यामुळे या वाक्यांत वर्णिलेली स्थिति प्राचीन काली के व्हा तरी खरी असली पाहिजे. नक्षत्रांची वचनें वर दिली आहेत ती त्या त्या नक्षत्रांतील तारासंख्या समजण्यास बरीच उपयोगी आहेत. मृगाच्या शीर्षस्थानी असलेल्या तारा मिळून सर्वीस मृगशीर्ष हे नांव आहे. तसेंच हस्ताच्या सर्व तारा मिळून हस्तसंज्ञा आहे. तेव्हां मृगशीर्ष आणि हस्त ही एकवचनें आहेत, तरी त्यांतील तारांची संख्या जास्त आहे. मृगशीर्षाबद्दल इन्वकाः अशी संज्ञा आलेली वर दिली आहे, ती बहुवचनींच आहे. बाकी नक्षत्रांपैकी रोहिणी, आर्द्रा, तिष्य, चित्रा, स्वाती, ज्येष्ठा, मूल, श्रोणा, शतभिषक, रेवती ही १० नक्षत्रे एकवचनी आहेत. यावरून त्यांतील तारासंख्या एकेकच असें सिद्ध होतें. पुनर्वसु, पूर्वफल्गुनी, उत्तरफल्गुनी, विशाखा, अश्वयुज् ही ५ द्विवचनी आहेत, तेव्हां त्यांतील तारा दोन दोन होत. बाकी कृत्तिका, आश्रेषा, मघा, अनूराधा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, अविष्ठा, पूर्वप्रोष्टपद, उत्तरप्रोष्ठपद, अपभरणी ही १० बहुवचनी आहेत. त्यांतील तारा दोहोंहून जास्त असल्या पाहिजेत. पैकी कृत्तिका नक्षत्राच्या तारा ७ असें पुढील वाक्यांवरून दिसून येते. अंबायै स्वाहा दुलायै स्वाहा || नितल्यै स्वाहाभयंत्यै स्वाहा ।। मेघयंत्यै स्वाहा वर्षयंत्यै स्वाहा । चुपुणीकायै स्वाहा ॥ तै. बा. ३.१.४. नक्षत्रेष्टीतील कृत्तिकेष्टींत ही वाक्ये आहेत. अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयती, चुपुणीका ही सातांची सात नांवें होत. चतलो देवीरजराः श्रविष्ठाः ।। तै. बा. ३. १. २. यावरून अविष्ठांच्या तारा चार असे दिसते. प्रोष्टपदासो अभिरक्षति सर्वे ।। चत्वार एकमभि कर्म देवाः ॥ प्रपदास इतियान् वदंति ।। ते बुनिय परिषद्य स्तुवतः ॥ अहि रक्षति नमसोपसय ॥ तै. ना. ३.१.२. यावरून उत्तर प्रोष्ठपदांच्या तारा चार असे दिसून येते. शतपथब्राम्हणांत म्हटले आहे. एक द्वे त्रीणि चत्वारीति वा अन्यानि नक्षत्राण्यथैता एव भूयिष्ठा यकृत्तिकाः॥ शत. बा.२.१.२. २. " दुसरी नक्षत्रे एक, दोन, तीन, चारच. ह्या कृत्तिका मात्र बहुत. " यावरून कृत्तिकांखेरीज कोणत्याही नक्षत्राच्या तारा चोहोंहून जास्त नाहीत, निदान रुत्तिकांहून जास्त नाहीत असें शतपथब्राम्हणावरून होतें. वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांतील तारांची संख्या आणि देवता आणि तत्तिरीय श्रुतींतील संख्या आणि देवता यांची तुलना दुसन्या भागांत करूं. सत्तावीस नक्षत्रांखेरीज दुसन्या कांहीं ताराविशेषांचा उल्लेख वेदांत आला आहे.