पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१.२.४ पहा). यांत 'संवत्सराच्या मध्यभागी विषुव हे आहेच. शिवाय सूर्य आकाशात कधी कमी उंच कधी जास्त उंच दिसतो त्यास अनुलक्षून कल्पना केलेल्या आहेत असे दिसते. यथा वै पुरुष एवं विषुवांस्तस्य यथा दक्षिणोर्ध एवं पूर्वाधों विषुवतो यथोत्तरोध एवमुत्तरार्धी विषुवतस्तस्मादुत्तर इत्याचक्षते प्रबाहुक्सतःशिर एव विषुवान् ऐ.बा.१८.२२. जसा पुरुष तसा विषुवान् . त्याचें ( पुरुषाचें ) जसें दक्षिणार्ध ( उजवें अंग) तसें ह्याचे पूर्वार्ध. त्याजें जसें उत्तरार्ध ( डावें अंग ) तसें ह्याचे उत्तरार्ध. म्हणून । विषुवानंतर सहामास सत्र चालतें त्यास ] उत्तर [ अर्थ असे म्हणतात. [ज्याचे वामदक्षिण ] भाग समान [ अशा बसला ] असलेल्या [ पुरुषा ] चे जसें शिर तसा विषुवान् . तैत्तिरीयब्राम्हणांतही अशाच त-हेचे पुढील वर्णन आहे. संततिर्वा एते ग्रहाः । यत्परःसामानः ॥ विषूवान दिवा कीयं ॥ यथा शालायै पक्षसी ॥ एव संवत्सरस्य पक्षसी ।। तै. ब्रा. १. २. ३. यांत संवत्सरसत्रासंबंधे काही सांगितले आहे. त्यांत, जसे शालेचे मणजे घ. राचे दोन पक्ष ( पांखी) तसे संवत्सराचे दोन पक्ष, आणि विषवान् हा त्याचा मध्यभाग, असें वर्णन आले आहे. - याप्रमाणेच विषुवान् शब्द पुष्कळ ठिकाणी येऊन तो दिवस संवत्सरसत्राच्या किंवा तदंगभूत परःसामन् इत्यादि अहांच्या मध्यभागी असें पुष्कळ ठिकाणी आ लें आहे. ज्या दिवशी दिनराविमान सारखें तो विषवान असा स्पष्ट उल्लेख वेदांत कोठे आढळला नाही. सत्राचा किंवा षडह इत्यादि अहांचा 'मधला दिवस' इतकाच त्याचा अर्थ आहे. मग ते सत्र वर्षभर चालणारे असो की थोडे दिवस चालणारें असो (तांड्य ब्राह्मण १३.४.१६ आणि त्यावरील सायणभाष्य पहा). दिनरात्रि समान असे विषुवान् वषांत दोन असतात. त्यांतल्या एका दिवशी सवत्सरसवास आरंभ केला तर त्या सत्राच्या मध्यभागी दुसरा एक विषुवान् येईल. आतां दिवसाचे विभाग वेदांत कसे आहेत हे पाहूं. दिवसाचे झणजे सूर्योदयापा सून सूर्यास्तापर्यंत कालाचे २, ३, ४, ५, १५ असे विभाग दिवसाचे भाग.. धर्मशास्त्र ग्रंथांतून आढळतात. दोन झणजे पूर्वाह्न आणि अपराह्न. तीन म्हणजे पूर्वाह्न, मध्यान्ह आणि अपराह्न. चार म्हणजे पूर्वाह्न, मध्यान्ह, अपराह्न आणि सायान्ह, म्हणजे दिवसाचे चार प्रहर. पांच म्हणजे प्रातः, संगव, मध्यान्ह, अपराह्न आणि सायं. आणि १५ ह्मणजे मुहूर्तसंज्ञक १५ विभाग. यांपैकी पहिला प्रकार म्हणजे द्वेधा विभाग स्वाभाविक आहे. तो वेदकालीं होता. त्रेधाविभाग पुढील दोन वाक्यांत आहे. तीन विभाग. ऋग्भिः पूर्वाह्ने दिवि देव ईयते ॥ यजर्वेदे तिष्ठति मध्ये अह्नः ॥ सामवेदेनास्तमये महीयते ॥ वेदैरशून्यनिभिरात सूर्यः । तै, बा. ३. १२. ९.१.