पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ऋग्वेदसंहितेत शरद्, हेमंत इत्यादि ऋतूंची नांवें पुष्कळ आली आहेत. तथापि एकंदरीत पाहतां नुस्ता ऋतु शब्द दोन्ही यजुर्वेदांत व बह्वच ब्राह्मणांत जसा फार वेळ आला आहे तसा कसंहितेत आला नाही. एकंदरीत ऋग्वेदसंहितेंत ऋतुमाहास्य फारसें दिसत नाही. क. सं. ५ व्या अष्टकाच्या ३ या अध्यायाच्या २८ व २९ या वर्गात “शं न इंद्रामी भवतां " (इंद्रानी आमचे कल्याण करोत ) याप्रमाणे अमक देव कल्याणकारक होवो अशी ५०।६० वाक्ये आली आहेत; परंतु त्यांत संवत्सर, ऋत, मास, नक्षत्रे कल्याण करोत असें एकही वाक्य नाही. इतक्या वाक्यसमूहांत यजुर्वेदांत ऋतूंची प्रार्थना आल्यावांचून राहिलीच नसती. ऋक्संहितेखेरीज इतर वेदग्रंथांत ऋतु ६ असा निर्देश पुष्कळ स्थली आहे व त्या सर्वांची नांवेंही एकलगत बरेच ठिकाणी आली ऋतुसंख्या. आहेत. (तैत्तिरीय संहिता ४. ३. २, ५. ६.२३, ७. ५. १४ इत्यादि पहा. कांहीं स्थळे वर दिली आहेतच.) बरेच स्थळीं पांच ऋतुं असेंही विधान आढळते. उदाहरणार्थ पंचशारदीयेन यजेत ॥...पंच वा ऋतवः संवत्सरः तै. बा. २.७.१०. " पंचशारदीयाने यजन करावें...[कारण ]. संवत्सराचे पांच ऋतु." पांच ऋतु मानीत तेव्हां हेमंत आणि शिशिर या दोहोंमिळून एक ऋतु मानित असे दिसते. पुढील वाक्य पहा. द्वादशमासाः पंचर्तवो हेमंतशिशिरयोः समासेन. ऐ. ब्रा. १.१. पांच ऋत मानले असतां हेमंत आणि शिशिर मिळून एक मानावयाचा असें तैत्तिरीयसंहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, यांवरूनही दिसते. अशा स्थळी हेमंतामध्ये शिशिराचा अंतर्भाव करावा असे काही प्रमाणे दाखवून माधवाचार्यही म्हणतात (कालमाधव, ऋतुनिर्णय पहा.) क्वचित् ऋतु तीन असेंही आढळतें. (शत. ब्रा. ३. ४. ४. १७.) वेदांत सहाही ऋतूंचा निर्देश जेथे जेथे एकत्र आला आहे तेथे पहिला ऋतु. तेथे वसंतापासून आरंभ आहे. याशिवाय ऋतूंत वसंत मुख्य अशी स्वतंत्र विधानेही आहेत. मुखं वा एतदृतूनां । यद्वसंतः ॥ तै. बा. १. १. २. ६, ७. "वसंत हा ऋतूंचें मुख होय." तस्य ते [ संवत्सरस्य ] वसंतः शिरः ॥ ग्रीष्मो दक्षिणः पक्षः । वर्षाः पुच्छं ॥ शरदुत्तरः पक्षः ।। हेमंतो मध्यं ।। तै. बा. ३. १०.४.१. यांसारखींच वाक्ये आणखीही दोन स्थली आली आहेत. यांत हेमंत हा संवत्सराचा मध्य मटला आहे आणि वर्षा हे पुच्छ (शेवट) मटले आहे. संवत्सर हा एक पक्षी कल्पिला म्हणजे