पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साधला आहे. राहुही फार चुकीचा नाही. चंद्र आणि राहु है सूर्यग्रहणावरून साधले असें याचा पिता केशव याच्या वर्णनांत आलेच आहे. वर्षांत थोडेच दिवस बुध दिसतो, यामुळे त्याचा वेध घेण्यास न सांपडल्यामुळे बुधास इतकी चुकी पडली असे वाटते. आणखी लक्ष्यांत ठेविले पाहिजे की, वरील चुका मध्यमग्रहांत आहेत, वेधानें स्पष्टग्रह मात्र समजतात. त्यांत ग्रहलाघवकालीं याहून कमी चूक असेल, याविषयी विवेचन बेंटलीच्या पद्धतीचा विचार करितांना केलेच आहे (पृ. १७२). ग्रहलाघवावरून येणान्या स्पष्टग्रहांस सांप्रत किती फरक पडतो हे पुढे पंचांगावचारांत दाखविले आहे. अमुक ग्रंथांतले अमुक ग्रह त्यांत अमुक फेरफार करून घेतले असतां दृक्तुल्य होतात असें गणेशानें मटले आहे, त्यांत त्याने शनीस फारच झणजे ५ अंशांचा फरक केला आहे. तसेच इतर ग्रहांसही कांहीं कलांचा फरक केला आहे. तेव्हां वस्तुतः मागील ग्रंथांचें नांव आधारास मात्र देऊन त्याच्या कालीं अनुभवास येणारी ग्रहस्थिति त्याने घेतली असें सहज दिसते. पूर्वग्रंथांतील ग्रहांस अंतर दिसून आल्यावरून गणेशाचा पिता केशव ह्याने वेध घेऊन जुन्या ग्रंथांस चालन देण्याची तयारी बहुतेक केली, व त्याप्रमाणे ग्रहकोतुक ग्रंथही केला. त्यांतही काही अंतर दिसून आलें तें घेऊन ग्रहशुद्धि केली असें लघुचिंतामणींत गणेश ह्मणतो. ग्रहकौतुक आणि ग्रहलाधव यांच्या तुलनेवरूनही तसे दिसते. ग्रहलाघव उदयास्ताधिकार, यांत तो ह्मणतोः पूर्वोक्ता भृगचंद्रयोः क्षणलवाः स्पष्टा भृगोश्चोनिता ॥ द्वाभ्यां तैरुदयास्तदृष्टिसमता स्याल्लक्षितेषा मया ॥२०॥ शुक्राचे कालांश प्राचीन आचार्यांनी जे सांगितले आहेत त्यांत दोन कमी करावे झणजे उदयास्त बरोबर अनुभवास येतात, असें मी पाहिले आहे, असें यांत तो ह्मणतो. या सर्व गोष्टींवरून तो स्वतः वेध घेणारा होता असे दिसून येतें. त्याच्याबद्दल ज्या दंतकथा सांप्रत आहेत त्यांत एक दोन अशा आहेत की त्याच्या पायास डोळे होते, ह्मणून त्यास चालतांना जमिनीकडे पहावे लागत नसे. ही गोष्ट असंभवनीय आहे. तरी यावरून त्याचे लक्ष्य नेहमी आकाशाकडे असे असें सिद्ध होते. दुसरी गोष्ट अशी आहे की, तो समुद्रतीरीं प्रचंड शिलांवर आकाशाकडे पहात बसलेला असे. ही गोष्ट संभवनीय आहे. कोंकणांत समुद्रकांठी अशा शिला पुष्कळ असतात. आणि तशा शांत स्थली बसून वेध घेणे सोईचे आहे. बापाच्या अनुभवाचा उपयोग आणि गणेशाचा स्वतःचा अनुभव यांच्या योगानें ग्रहमा लाघव ग्रंथ ग्रहकौतुकापेक्षा अधिक दृक्प्रत्ययद झाला असला पाहिजे. " व काही गोष्टींत ग्रहलाघवापेक्षा ग्रहकौतुकांतील गणित करण्याच्या रीति सोईच्या आहेत, तरी काही गोष्टींत ग्रहलाघव अधिक सोईचा आहे. यामुळे ग्रहकौतुक ग्रंथाचा लोप होऊन ग्रहलाघव प्रचारांत आला असे दिसते. एकंदरीत पाहतां गणेशापेक्षा त्याच्या बापाची योग्यता मला जास्त वाटते. तरी केवळ ग्रंथाची योग्यता पाहिली असतां बापलेकांचे दोघांचे अनुभव ग्रहलाघवांत एकत्र झाल्यामुळे ग्रहलाघवाची योग्यता जास्त आहे.