पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६१) कोणते ग्रह कोणत्या ग्रंथावरून घेतले असतां मिळतात याविषयीं गणेश दैवज्ञ ह्मणतो: सौराकोपिविधूच्चमंककलिकोनाजो गुरुस्त्वार्यजो ॥ इसृग्राहू च कजज्ञकेंद्रकमथार्यः सेषुभागः शनिः ।।: शौयं केंद्रमजार्यमध्यगमितीमे यांति दृक्तल्यतां ॥ मध्यमाधिकार. आणि याप्रमाणेशके १४४१ फाल्गुन कृष्ण ३० सोमवार प्रातःकाळचे ग्रह वर लिहिल्याप्रमाणे काढले असतां जमतात. ते असे की, सांप्रतच्या सूर्यसिद्धांतावरून सूर्य, चंद्रोच्च आणि चंद्र काढून चंद्रांत नऊ कला वजा करून जमतात. आर्यपक्षाचा ग्रंथ करणप्रकाश यावरून गुरु, मंगळ, राहु आणि शनि काढून शनींत ५ अंश मिळवून जमतात. ब्रह्मपक्षाचा ग्रंथ करणकुतूहल यावरून बुधकेंद्र मिळते. आणि करणप्रकाश आणि करणकुतूहल यांवरून शुक्रकेंद्र काढून त्यांचे अर्ध केले असतां जमते. मात्र क्षेपकांत गणेशाने विकला सोडल्याच आहेत आणि कोठे कांहीं कला कमजास्त केल्या आहेत; यामुळे कलांत क्वचित् काही अंतर पडते. वरील ग्रह काढतांना करणप्रकाशाचा अहर्गण १५६३३४ येतो आणि करणकुतूहलाचा १२३११३ येतो.* यांणी गणित करणे किती वासाचे आहे हे दिसून येईल. गणेशानें ग्रहसाधन अहगणावरूनच करण्याची रीति दिली आहे, परंतु अहर्गण फार न वाढण्याची युक्ति केली आहे. ती अशी की ११ वर्षांचे सुमारे ४०१६ दिवस होतात, तितक्या अहर्गणाचें एक चक्र कल्पिलें आहे. आणि तितक्या दिवसांत ग्रहमध्यमगति जितकी होते तिला 'ध्रुव' अशी संज्ञा दिली आहे. त्या गतचिा संस्कार केला ह्मणजे मध्यमग्रह निघतात. या युक्तीने अहर्गण ४०१६ हून कधींच जास्त होत नाही. ग्रहलाघव ग्रंथाचा आणखी विशेष असा की, त्यांत ज्या आणि चाप यांचे मुळींच विशेष कारण ठोवले नाही. आणि असे असून पूर्वीच्या कोणत्याही करणग्रं थापेक्षां यांत कमी सूक्ष्मता आहे असें नाहीं असें ह्मणण्यास अगदी हरकत नाही. सांप्रतच्या इंग्रजी ग्रंथांत प्रत्येक अंशाच्या भुजज्यादि असतात, इतकेंच नाही तर प्रत्येक कलेच्या असतात. काही पुस्तकें तर अशी झालेली आहेत की त्यांत प्रत्येक विकलेच्या आहेत. आमच्या सिद्धांतांत प्रति ३॥ अंशांच्या भुजज्या आहेत. ह्मणजे एकंदर २४ ज्यापिंड होतात. परंतु करणग्रंथांत बहुधा ९ ( दर १० अंशांचा एक असे) किंवा त्यांहून कमीच ज्यापिंड असतात. ग्रहलाघवांत भुजज्यांचा उपयोग केला नसून सूर्यस्पष्टीकरण इतके सूक्ष्म साधलें आहे की, इतर करणग्रंथांत ज्यांचा उपयोग केलेला असून त्यांहून ग्रहलाघवसूर्य सूक्ष्म येतो, इतकेच नाही, तर २४ ज्यापिंड ज्यांत आहेत अशा सिद्धांतग्रंथांपेक्षाही कोठे कोठे सूक्ष्म येतो. एकंदरीत ग्रंथांत सर्वत्र सर्व कति सुलभ रीतीने होईल असें करण्याकडे गणेशाने लक्ष

  • गणेश देवज्ञाने अमक्या ग्रंथावरून अमुक ग्रह घेतले हे जसें मी दाखविले आहे तसें टीकाकारांपैकी कोणी दाखविलें नाहीं.

1 ११ वर्षांत कमजास्त दिवस होतात त्यांची कसर न जाण्याची युक्ति केली आहे. चक्रांतील प्रहगति चक्र शुद्ध केली असल्यामुळे ती क्षेपकांत वजा करून व अहर्गणावरून आलेली गति मिळवून इष्टकालीन मध्यममह निघतो.