पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४३) पूर्वीचा उपलब्ध नाही. तेव्हां शक १००० पासून किंवा कदाचित् लल्लापासूनच तीन पक्ष अगदी भिन्न होऊन त्यांचे अनुयायी आपापल्या पक्षाचा अभिमान बाळगिणारे झाले असतील. ग्रहलाघवांत आर्यपक्षाचे ह्मणून जे ग्रह घेतले आहेत ते करणप्रकाशावरून घेतले आहेत. भास्वतीकरण. हा एक करणग्रंथ आहे. यांत आरंभवर्ष शक १०२१ आहे.शतानंद नामक ज्योकाल. कर्ता. तिषाने हा केलेला आहे. शतानंद हा पुरुषोत्तम ह्मणजे जगन्नाथपुरी एथील राहणारा होता, व त्याने क्षे पक तेथले दिले आहेत, असें अनिरुद्धनामक भास्वतीटीस्थल, काकार ह्मणतो. सिद्धांतादि गणितग्रंथ कोणत्याही स्थली झालेले असले तरी त्यांत क्षेपक उज्जयिनीचे असतात अशी रीति दिसून येते. परंतु उज्जयिनीरेषेपासून जगन्नाथ पुष्कळ दूर असल्यामुळे भास्वतीकाराने ती पद्धति सोईसाठी सोडिली असावी; व तें योग्य होय. शतानंदानें आरंभी “नत्वा मुरारेश्चरणारविंदं" असें मटले आहे. यावरून तो वैष्णव होता असें त्याचा एक टीकाकार माधव हा ह्मणतो. पहिल्या अधिकारांत शतानंद ह्मणतोः अथ प्रवक्ष्ये मिहिरोपदेशात् तत्सूर्यसिद्धांतसमं समासात् ॥ ३ ॥ भास्वतीवरील एक टीकाकार माधव याने यांतील मिहिर ह्मणजे सूर्य असा अर्थ म करून त्याच्या सिद्धांताप्रमाणे ह्मणजे सूर्यसिद्धांतावरून अशा प्रकारचा अर्थ केला आहे. आणि ग्रहांचे क्षेपक आणि गति यांची उपपत्ति सांप्रतच्या सूर्यसिद्धांतावरून लावण्याचा यत्न केला आहे. परंतु तो निष्फल झाला आहे. जेथे तेथे आचायनि अमुक कसर सोडिली अशा प्रकारे समाधान करावे लागले आहे. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंतील सूर्यसिद्धांताप्रमाणे शतानंदानें हें करण केले आहे हे माधवाच्या मुळीच लक्ष्यांत आले नाही. त्याच्या वेळी (शके १४४२) पंचसिद्धांतिका प्रचारांतून अगदी गेली असावी, व त्यामुळे असे झाले असे दिसते. भास्वतीवरील दुसऱ्या कांहीं दीका मी पाहिल्या त्यांत क्षेपकांची उपपत्ति नाही. भास्वतीमध्ये क्षेपक दिले आहेत ते स्पष्टमेषसंक्रमणकालचे ह्मणजे शके १०२१ अमान्त चैत्र कृष्ण ३० गुरुवार या दिवशींचे आहेत. त्या दिवशींचे कोणत्या वेळेचे हे मला बरोबर समजले नाही. यामुळे ते कलाविकला सुद्धां बरोबर जमतात की नाही हे पाहता आले नाही. तथापि क्षेपक स्पष्टमेषसंकमण दिवशींचे आहेत, आणि वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंतील सूर्यसिद्धांनावरून मध्यमग्रह करून त्यांस त्याने सांगितलेला बीजसंस्कार (पृ. २१५) दिला असतां क्षेपक बहुतेक अंशी मिळतात.* यावरून मूलसूर्यसिद्धांतास वराह पंचसिद्धांतिकेवरून भास्वतीक्षेपक आणतांना अहर्गण २१६९६२ येतो. यावरून गुणाकारभागाकार करण्यास किती आयास हे दिसून येईल. हीच वर्षगति दिली असती तर वरील संख्येच्या जागी ( १०२१-४२७ =)५९४ संख्या येऊन तीवरून ग्रह करण्यास फार सुलभ पडते. आधार.