पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२४) कारतों असें याने म्हटले व त्याप्रमाणे बहुतांशी केले आहे, हे आश्चर्य आहे. या कारणे दोन दिसतात. एक त्या वेळी आर्यभटाचा ग्रंथ इतका लोकमान्य झाला सावा की त्यास तो सोडतां येईना. आणि दुसरे याच्या स्वतःच्या सिद्धांताची संक्रा खंडखाद्यरचनाकाली म्हणजे शके ५८७मध्ये मूलसूर्यसिद्धांताच्यापूर्वी ५५ ५.३६८५ आणि आर्यभटीयाच्यापूर्वी ५४ घ. ५५२ प. येत होती. इतका फरक असल्यामूल अधिकमासादिही दोषांचे भिन्न येणार. अधिकमास भिन्न आणि संक्रांति एकाद वस पूर्वी येणे ही गोष्ट अज्ञान मनुष्यास सुद्धा समजणारी, यामुळे स्वतःच्या सिद्धा ताचें मान सुरू करण्यास लोकमताची प्रतिकूलता. या दोन्ही कारणांनी स्वतः सिद्धांताशी तुल्य असें करण करण्यास त्यास धैर्य झाले नाही असे दिसते. सका। तीला एक दिवसाहून कमीच फरक असतां ब्रह्मगुप्तास आपलें मान प्रचारांत आण वलें नाही. मग सांप्रत केरोपंती पंचांगाची संक्रांति जुन्या पंचांगाहून सुमारे ४ पद वस पूर्वी येते आणि सायनपंचांगाची २२ दिवस पूर्वी होते, तर अशी पंचांगें प्रवृत्तात येणे किती कठिण आहे ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. खंडखायावर वरुण आणि 'भटोत्पल यांच्या टीका आहेत. प्रथूदकाची टाका लायती असावी असे दिसते. परंतु ती कोठे आढळली नाही. आ. मणखी एक खंडित टीका आहे; तींत टीकाकाराचें नांव नाही; परंतु उदाहरणार्थ शक १५६४ घेतला आहे, चर देशांतर इत्यादि संस्कार काश्मारदेशच्या संबंधे आहेत, यावरून तो टीकाकार काश्मीर देशांतला आहे हे स्पष्ट आहे. पंचांगकौतुक म्हणून एक ग्रंथ डेक्कन कॉलेज संग्रहांत आहे. (नं. ५३७ सन १८७५/७६). त्यांत पंचांगसाधन फार सुलभ रीतीने होण्यासारख्या सारण्या व रीति आहेत. त्यांत आरंभवर्ष शके १५८० आहे आणि सर्व गणित खडखायाच्या आधारे केले आहे. हा ग्रंथ काश्मीरांत झाला असें कोठे त्यांत आढळत नाही. तथापि तें पुस्तक काश्मीरांत सांपडलेले आहे आणि त्यांत काश्मीरात चालणान्या लौकिककालाचा उपयोग केला आहे. यावरून तो ग्रंथकार काश्मारांतला असावा असे स्पष्ट दिसते. यावरून शके १५८० पर्यंत खंडखायकरण काश्मीरांत प्रचारांत असावें हें निःसंशय आहे. आणि अद्यापिही तिकडे तें प्रचारात असेल असें खंडवायाच्या वर लिहिलेल्या तिन्ही टीकांची पुस्तकें आणि पंचांगकौतुक ह्यांच्या पुणे कॉलेजसंग्रहांतल्या प्रती काश्मीरांत सांपडल्या यावरून वाटते. भास्कराचार्याने खंडवायाचा उल्लेख केला आहे. अलबिरुणीस (शक ९५०) खंडखाद्यग्रंथ मिळाला होता. त्याने त्यांतले कांहीं उतारे दिले आहेत. ब्रह्मगुप्ताने आपल्या सिद्धांनाहून निराळा खंडखायग्रंथ केला यावरून आपल्या ब्रह्मसिद्धांतप्रचार. सिद्धांताचे अनुयायी कोणी होतील असा भरंवसा त्यास आला नसावा. आपरितोषाद्विदुषां न साध मन्ये... विज्ञानं ॥ या कालिदासोक्तीप्रमाणे असे होणे साहजिक आहे. आपल्या वयाच्या ६७ व्या वर्षी त्याने खंडखाद्य रचिलें. तोपर्यंत त्याचा सिद्धांत प्रत्यक्ष प्रचारांत आला नसेल. आणि वयाची इतकी वर्षे जाईपर्यंतही आपले अनुयायी कोणी होत नाहीत असें पाहून शेवटी निराश होऊन त्याने खंडखाय रचिले असावें. आपल्या कृतीचें सार्थक्य आपल्या डोळ्यांदेखत पाहणे इतकें भाग्य महान् शोधकांपैकी थोड्यांचेच असते.