पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९०) वाटते की सायनरवीचें मेषसंक्रमण तेंच त्याने मेपसंक्रमण मानले. सिद्धांतांत तो म्हणतो:-- यदि भिन्नाः सिद्धांता भास्करसंक्रांतयोपि भेदसमाः ।। स स्पष्टः पूर्वस्यां विषुवत्यर्कोदयो यस्य ॥ ४ ॥ अ. २४. 'जर सिद्धांत भिन्न असतील तर सूर्याच्या संक्रांतिही त्या भेदाप्रमाणे झाल्या पाहिजेत. परंतु तो सूर्य तर विषुवदिवशी पूर्वेस सूर्योदयीं स्पष्ट दिसतो.' याचे तात्पर्य इतकेंच की, आकाशांत सूर्यसंक्रमण भिन्न भिन्न काली दिसावयाचें* नाही. यांत विषुवदिवशींच्या सूर्योदयकालच्या सूर्याचा उल्लेख आहे. यावरून तो सायनसूर्यच होय. आणि प्रत्यक्ष वेधानें ब्रह्मगुप्ताने ही गोष्ट दिली हे स्पष्ट आहे. ब्रह्मगुप्तास अयनगति माहित नव्हती. त्याच्या पूर्वी ती माहित असेल तर त्याने ती विचारांत घेतली नाही यांत तर संशय नाहीच. यामुळे त्याच्या दृष्टीने सायनसूर्य, आणि ग्रंथागत (निरयन) सूर्य हा भेद नाहींच. सायनसूर्य तोच सिद्धांतावरून निघेल असें त्याने केले. परंतु हे त्याच्या कालापुर्ते मात्र झाले. याचे कारण असे की त्याच्या वेळी सुमारे ५४ घटिका संक्रमण अगोदर झाले. परंतु कलियुगारंभी ( त्याच्या मतें शुक्रवारी सूर्योदयीं) मध्यममूर्य मेषारंभीं होता हा जो दृढ ग्रह परंपरागत आलेला. त्याच्या बाहेर त्याला जातां येईना. यामुळे कलियुगारंभापासून ब्रह्मसिद्धांतरचनाकाल पर्यंत सुमारे ३७३० वर्षे गेलीं, तितक्या वर्षांवर ५४ घटिका चुकी त्याने विभागिली, आणि आकाशांत प्रत्यक्ष सूर्य पूर्वेस उगवेल त्या वेळी झणजे सायनमेषी आपल्या सिद्धांताप्रमाणे मेषसंकमण व्हावे असे त्याने केले. यामुळे वर्षमान कांहीं विपळे मात्र कमी झाले. कलियुगारंभापासून स्वकालपर्यंत चुकी विभागावयाची हे लचांड त्यांच्यामागे नसते, आणि अमुक कालापासून आजपर्यंत संक्रमण इतके मागे आले असा त्याने विचार केला असता, तर वर्षमान सायन रणजे ३६५ दि.१४ घ.३२ प. धरणे किंवा वर्षमान पूर्वीचेच ठेवून अयनगति ( संपातगति ) मानणे या दोहोंतून कोणती तरी एक गोष्ट त्याने केली असती. सिद्धांतानंतर ३७ वर्षांनी त्याने खंडखायकरणग्रंथ केला. आणि त्यांत वर्षमान मूलसूर्यसिद्धांताचें घेतले आहे. यावरून दिसतें कीं वर्षमान पूर्वीचेंच ठेवून अयनगति मानण्याकडे त्याचा कल झाला असावा. किंवा सायनवर्षाचे वास्तवमान त्याच्या लक्ष्यांत येऊन तेंच घेतले पाहिजे असा त्याचा ग्रह वस्तुतः झालेला असला तरी परंपरागत चालत आलेलें वर्षमान सोडणे व आपण सिद्धांतांत घेतलेलेही वर्षमान पुनः बदलणे हे त्याच्याने करवले नसावें. भास्कराचार्याने "कथं ब्रह्मगुप्तादिभिनिपुणैरपि [कांतिपातः ] नोक्तः 7 + असे म्हटले आहे. यावरून ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथांत मूळचें अयनगतीविषयी काही नाहीं असे दिसते.

  • "ब्रह्मासिद्धांत हा मात्र एक सिद्धांत, बाकीची केवळ ग्रंथरचना असं तो म्हणतो आणि इतर सिद्धांतांस वारंवार दोष देतो तो अशा विसंवादामुळेच. इतरांची से कांत त्याच्या पुढे समारें एक दिवस! गिोलबंधाधिकार आर्या १७-१९ टीका.