पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या ग्रीकांपासून उच्चपात घेतले हे म्हणणे योग्य आहे की काय याचा विचार वाचकांनी करावा. टालमीचे उच्चपाताचे अंक-जे हिपार्कसचे त्याने घेतले असतील असें संभवतें ते-आणि आमच्या ग्रंथांवरून येणारे, यांत उच्चांत ३ पासून ३० अंशपर्यंत आणि पातांत ४ पासून ८२ अंशपर्यंत अंतर आहे. हिपार्कसच्या (इ. स. पूर्वी १५०) वेळेपासून शके १२१ (इ. स. ५००) पर्यंत ६५० वर्षात इतकी गति झाली हे त्यांनी काढून तितका फेरफार करून आपल्या 'ग्रंथांत स्थिति दिली असे मानले तर दोहोंच्या अंकांमध्ये कांहीं नियमित अंतर दिसले पाहिजे. तसें नाही. आणि ६५० वर्षांत इतकी गति होते असे जर त्यांनी काढले होते तर त्यांनी उच्चपातगति पुष्कळ दिली असती, परंतु ती तर ते १३,००० वर्षांत एक अंशाहून कमीच देतात. यावरून टालमीच्या पूर्वीच्या ग्रंथांवरूनही हिंदूंनी उच्चपात घेतले नाहीत असे सिद्ध होते. आमच्या सिद्धांतकारांनी स्वतंत्रपणे आपापल्या वेळची उच्चपातस्थिति काढली याविषयी आणखीही प्रमाण आहे. मूलसूर्यसिद्धांतांत उच्चपातांचे कल्पांतील भगण दिले होते की नाही हे समजण्यास काही मार्ग नाहीं. पंचसिद्धांतिकेंत ते नाहीत. पहिल्या आर्यभटाने ते दिले नाहीत, आपल्या वेळची उच्चपातस्थिति मात्र त्याने दिली आहे. यावरून उच्चपातांस गति असल्यास अत्यल्प आहे एवढे त्याच्या लक्ष्यांत आले असावे; परंतु ती गति थोड्या दिवसांत समजणारी नसल्यामुळे त्याने युगभगण दिले नाहीत. इष्टकाली रव्युच्च कसे काढावे याविषयी रीति लिहून त्याच्या गतीविषयीं भास्कराचार्य लिहितो: उच्चस्य चलनं वर्षशतेनापि नोपलक्ष्यते कित्वाचार्यैश्चंद्रमंदोचवदनुमानात् कल्पिता गतिः सा चैवं ।। यैर्भगणैः सांप्रताहर्गणार्षगणाद्वा एतावदुचं भवाति ते भगणा युक्तया कुट्टकेन वाकल्पिताः॥ याचे तात्पर्य इतकेंच की"शेंकडों वर्षांनीही उच्चगति अनुभवास येत नाही. परंतु चंद्रोच्चगति प्रतीतीस येते त्याप्रमाणे रव्युच्चासही गति असेल असें अनुमान करून, जे भगण मानले असतां इष्ट कालाची स्थिति निघते तितके उच्चभगण युक्तीने कल्पिले. इतर ग्रहांच्या उच्चाविषयीं व पाताविषयीं असेंच समजावें असें भास्कराचार्याने लिहिले आहे. यावरून इष्टकाली उच्चपात कोठे आहेत हे कसे काढावें हे आमच्या सिद्धांतकारांस माहित होते व त्याप्रमाणे त्यांनी ते काढून तदनुसार भगण कल्पिले. यावरून आमच्या सिद्धांतकारांनी स्वतंत्रपणे उच्चपातांची आपापल्या कालची स्थिति काढली असें सिद्ध होतें. वराहमिहिर. हा एक नामांकित ज्योतिषी होऊन गेला. ज्योतिषाच्या तीनही शाखांवर याचे ग्रंथ आहेत. याच्या कालाविषयी थोडासा विचार करूं. काल, याने स्पष्टपणे आपला काल कोठे सांगितला नाही. परंतु पंचसिद्धांतिकाकरणग्रंथांत गणितास आरंभवर्ष घेतले आहे ते शक ४२७ आहे असें पूर्वी सांगितलेच आहे. त्याच वर्षी त्याने तो ग्रंथ केला असेल तर त्यावेळी तो निदान २० वर्षांचा असला पाहिजे. त्याहून कमी वयांत तसा ग्रंथ होणे संभवत नाही. आणि त्याप्रमाणे पाहिले तर त्याचा जन्म शके ४०७ च्या सुमारास झाला

  • कल्पारंभी मेषारंभी उच्चस्थिति मानन.