पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग पहिला.. वैदिक काल आणि वेदांगकाल यांतील ज्योति शास्त्राचा इतिहास. दा२५७. विभाग पहिला. वैदिक काल. वेदांमध्ये ज्योतिःशास्त्राचे विषय कोणकोणते, कोणत्या प्रकारे आले आहेत याचा विचार करूं. वेद हे केवल ज्योतिःशास्त्रविषयक नाहीत हे सांगावयास नकोच. तेव्हां त्यांमध्ये ज्योतिःशास्त्रसंबंधे कोणतीही गोष्ट मुद्दाम सांगितलेली असेल असें नाहीं हे उघड आहे. तेव्हां कारणवशात् इतर विचारांमध्ये ज्योतिःशास्त्रांतील काही गोष्टी साहजिक आल्या असतील त्या पाहून त्यांवरून सामान्यतः कांहीं अनुमाने निघत असतील तर काढावयाची, आणि कोठं तशी अनुमाने काढण्यास जितकी उपकरणे पाहिजेत ती सर्व संगतवार नसतील तर तशा स्थली ज्या ज्या गोष्टी आढळतील त्या तशाच सांगावयाच्या, एवढे आपल्यास करितां येईल. केवळ वर वर पाहिले तरी सरूद्दर्शनींच दिसून येते की, आपल्या प्राचीन पूर्वजांस सृष्टीचे, त्यांतही आकाशांतील चमत्कारांचे अवलोकन करण्याचा मोठा नाद होता. कोणताही वेद किंवा वेदभाग किंबहुना त्यांतला एकादा प्रपाठक घ्या. त्यांत अ काश, चंद्र आणि सूर्य, उषा आणि सूर्यरश्मि, नक्षत्रे आणि तारा, ऋतु आणि मास, दिवस आणि रात्र, वायु आणि मेघ याविषयी काही ना काही तरी वर्णन सांपडणार नाही असें बहुधा व्हावयाचें नाही. आणि तें वर्णनही अत्यंत मनोहर, स्वाभाविक, सुंदर, चमत्कारिक, आणि आश्चर्यकारक असे असते. या प्रकारच्या वर्णनाचे कांहीं मासले एथें दिले तर काही अंशी विषयांतर होईल व उगाच विस्तार होईल ह्मणून तसे करीत नाही. आतां प्रथमतः जगाची उत्पत्ति, सृष्टीची रचना, यांविषयी वेदामध्ये काय विश्वोपन आहे हे पाहूं. ऋग्वेदसंहितेत एके ठिकाणी असें वर्णन आहे:देवानां नु वयं जाना प्रवोचाम विपन्यया ॥ उक्थेषु शस्यमानेषु यः पश्यादुत्तरे युगे ॥१॥ असणस्पातरतास कमोर इवाधमत् ॥ देवानां पू] युगेसतः सदजायत ॥२॥ देवानां युगे प्रथमेसतः सदजायत । तदाशा अन्वजायंत तदुत्तानपदस्परि ॥३॥ भूर्जज्ञ उत्तानपदो भुव आशा अजायत ।। अदितेर्दक्षो अजायत दक्षाद्वदितिः परि ॥४॥ अदितिजिनिष्ट दक्षया दुहिता तव ।। तां देवा अन्वजायंत भद्रा अमृतबंधवः ॥५॥ ऋ.सं.१०.७२.