पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुध खेरीज करून बाकी भगण मूलसूर्यसिद्धांतांतले घेतले. गुरु आणि बुध यांचे भगण याने स्वतःच्या अनुभवावरून दृक्प्रत्ययास मिळतील असे घेतले असावे असे दिसते. आर्यभटाची युगपद्धति इतर सिद्धांतांहून किंचित् भिन्न आहे असें वर सांगियुगपद्धति. तले. ती पद्धति अशी आहेः दशगीतिकांत तो ह्मणतोः काहो मनवो ढ २४ मनुयुगरख ७२ गतास्तेच ६ मनुयुगछ्ना २७ च ।। कल्पादेर्युगपादा ग ३ च गुरुदिवसाच्च भारतात् पूर्व ॥ ३ ॥ यांत एका मनूची युगे ७२ आहेत. इतरांप्रमाणे ५१ नाहीत. प्रत्येक मन्वंतरारंभी संधि सांगितला नाही. *भारतगुरुदिवसापूर्वी कल्पादीपासून अमुक काल गेला असें यांत सांगितले आहे. यावरून व (पृ. १९२) वर दिलेल्या २ या आर्येवरून कलियुगारंभ शुक्रवारी झाला, त्याच्या पूर्वदिवशी गुरुवार होता असें आर्यभटाचें मत दिसून येते. परंतु महायुगारंभ। बुधवारी सूर्योदयीं झाला असें वरील दुसऱ्या आर्यंत आहे. यावरून कलियुगाच्या दुप्पट द्वापर, इत्यादि परिभाषा तो मानीत नाही. तसे मानले तर युगारंभ बुधवारी धरून कलियुगारंभ शुक्रवारी येत नाही. सर्व युगपाद सारखे मानून ते जमते. यावरून कृतादि युगपाद तो सारखे मानतो असें निघते. आणि यावरून पाहतां कल्पारंभापासून वर्तमानकलियुगारंभापर्यंत आर्यभटाच्या मताप्रमाणे १९८६१२०००० इतकी वर्षे गत होतात, आणि कल्पारंभ गुरुवारी येतो. इतर सर्व सिद्धांतांप्रमाणे कल्पारंभापासून वर्तमानकल्यादिपर्यंत गतवर्षे १९७२९४४००० येतात; आणि कल्पारंभी, किंवा सृष्टयुत्पत्तीस कांहीं में लागली असे कोणी मानतात, त्यांच्या मते ग्रहप्रचारारंभी, रविवार येतो. हा जो इतरांशी आर्यभटाचा भेद आहे त्याबद्दल ब्रह्मगुप्ताने त्यास दूषणे दिली आहेत. न समा युगमनुकल्पाः कल्पादिगतं कृतादियातं च ॥ स्मृत्युक्तैरार्यभटो नातो जानाति मध्यगति॥१०॥ ब्रह्मगु.सि. अ.११. यांत आर्यभटाचे युग, मनु आणि कल्प स्मृतीत सांगितल्याप्रमाणे नाहीं असेंही ब्रह्मगुप्ताने म्हटले आहे. महायुग त्याचे आणि इतरांचे सारखेच आहे. वरील भगणसंख्या पाहिल्या असतां दिसून येते की सर्व ग्रहांच्या भगणसंख्या चोहोंनी विभाज्य आहेत. आणि सर्व ग्रह महायुगारंभीं एकत्र होते असें वरील २ या आर्येत आहे. तसेच आर्यभटाच्या मते सर्व युगपाद सारखे आहेत. तसेंच कल्पादिपासून वर्तमानकतादिपर्यंत महायुगसंख्या त्याच्या मतें पूर्ण गेलेली आहे. यामुळे त्याच्या मताप्रमाणे कल्पारंभी, प्रत्येक महायुगारंभी, आणि युगपादारंभी सर्व ग्रह एकत्र येतात. इतर ग्रहांची मंदोच्चे आणि पाद यांचे कल्पभगण त्याने दिलेच नाहीत. सृष्ट्युत्पतीस काही वर्षे लागली की काय याचा विचार करावयाचे त्यास कारणच पडले नाही; परंतु त्याच्या मताप्रमाणे कल्पारंभींच सर्व ग्रह एकत्र येतात. यामुळे त्याने

  • भारत ह्मणजे भारती युद्ध. एथे तो शब्द कलियुगारंभ या अर्थी आहे. +महायुगारंभ असे स्पष्ट नाही. तरी पूर्वापर संदर्भ व उपपत्ति यांवरून तसेच निघते. * सृष्टव्युत्पत्तीस काही वर्षे गेली असें मानितात ती वर्षे धरून.

वरील बहुतेक गोष्टी ब्रह्मगुप्ताने सांगितल्या आहेत. परंतु मी केवळ त्यावर भरंवस दान स्वतः त्या काढून पाहिल्या आहेत.