पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) सिद्धांतिका वाक्यांत सांगितलेली गति प्रत्यही सारखीच असणार. तिला मध्यम गति ह्मणतात. परंतु प्रत्यक्ष दिसणारी एकेका ग्रहाची गति नहमी सारखी नसते. उदाहरण, गुरुभगणाचा काल सुमारे १२ वर्षे आहे, त्या मानाने त्याची मध्यम दिनगति सुमारे ५ कला येते; परंतु प्रत्यक्ष पाहिले तर गुरु याहून कधी जास्त चालतो, कधी कमी चालतो; कधी त्याची दिनगति सुमारे १५ कला असते आणि कधी तर तो एका कलेहूनही कमी चालतो; इतकेच नाही तर कधी उलट (पूर्वेकडून पश्चिमेस) चालतो. ( ह्या गतीला बंकगति म्हणतात). ह्याप्रमाणे रोजची जी त्यक्ष गति तिला स्पष्ट गति म्हणतात; तसेच मध्यमगतीने ग्रह आज अमुक स्थळा .आहे असें निवालें तर प्रत्यक्ष त्याच्या काहींसा मागे पुढे असतो. प्रत्यक्ष जी स्थिति ती स्पष्ट स्थिति आणि मध्यम गतीवरून येणारी जी स्थिति ती मध्यम स्थिति होय. (इष्टकाळची कोणत्याही ग्रहाची स्पष्ट स्थिति गणिताने काढणे, म्हणजे कोणत्याही वेळी तो ग्रह आकाशांत कोठे असेल हे काढणे हा आमच्या ज्योति शास्त्राच्या गणितस्कंधाचा प्रधानविषय होय.) (अयनचलन--सूर्य एका नक्षत्रीं आल्यापासून पुनः त्याच स्थली येईपर्यंत जो कालतें नाक्षत्रसौरवर्ष होय. विषुववृत्त आणि क्रांतिवृत्त यांचा छेद दोन ठिकाणी होतो. त्या बिंदूस संपात किंवा कांतिपात म्हणतात. सूर्य ज्या संपातीं आल्यावर विषुववृत्ताच्या उत्तरेस जातो व त्या वेळी वसंतऋतु असतो त्या संपातास मेषसंपात अथवा वसंतसंपात म्हणतात. (एका वेळी वसंतसंपातीं एक तारा आहे व त्याच वेळी सूर्य तेथं आला व वर्षास सुरुवात झाली अशी कल्पना करूं. संपातास गति आहे. तो दर वर्षास सुमारे ५० विकला मागे सरतो; यामुळे नक्षत्रमंडल तितकें पुढे सरकलेले दिसते. संपातापासून सूर्य निघाल्यावर पुनः संपाती येण्यास जो काळ लागतो तें सांपातिक सौरवर्ष होय. ह्यालाच आर्तववर्ष आणि सायनवर्ष अशा संज्ञा आहेत.) संपातीं सूर्य येतो तो पूर्वीचे नक्षत्र ५० विकला पुढे गेलेले असते, तेथपर्यंत जाण्यास सूर्यास सुमारे ५० पळे जास्त लागतात. अर्थात् सांपातिक सौरवर्षापेक्षां नाक्षत्र सौरवर्ष सुमारे ५० पळे जास्त आहे. ऋतुं सांपातिक वर्षावर अवलंबून आहेत. संपाती सूर्य येईल तेव्हां एकदा जो ऋतु अमेल तोच कोणत्याही काली संपाती सूर्य येईल तेव्हां असेल; परंतु एका नक्षत्री सूर्य येईल तेव्हां एकदा जो कतु येईल तोच त्या नक्षत्री सूर्य येईल तेव्हां नेहमी होणार नाही हे उघड आहे. वृत्ताचा एक बिंदु चळला म्हणजे सर्वच बिंदु हलणार. संपात मागे येतो तसेच अयनबिंदूही मागे येतात; म्हणजे एकदा ज्या नक्षत्री सूर्य आला असतां उदगयन होते त्याच्या मागे मागे कालांतराने अयन होऊ लागते. संपाताची जितकी गति तितकीच अयनबिंदूंचीही असते. ती गति प्रथम 'मर्याची अयने नक्षत्रांत मागे मागे होऊ लागली ह्यावरून समजली. म्हणून तिला अयनचलन असें म्हणतात. कालगणनेची युगपद्धति--कलियुगाचें मान ४३२००० वर्षे आहे. ह्याच्या अनमें २, ३, ४ पट द्वापर, बेता, कृत ही युगे आहेत. ह्या चार युगांमिळून जग होते. अर्थात् तें कलियुगाच्या दसपट असते, व त्याच मान