पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १५९) त्याचें वर्षमान आमच्या इतर कोणत्याच सिद्धांतांत नाही. त्यांत सर्वमान्य युगपद्धति नाही. व त्याचें नांव रोमक हे पाश्चात्य दिसते. या गोष्टींचा विचार करितां मूल रोमकसिद्धांत हा हिपार्कसच्या ग्रंथास अनुसरून केलेला दिसतो. व तो इ. स. पूर्वी १५० च्या नंतर व टालमीच्या म्हणजे इ. स. १५० च्या पूर्वी केव्हां तरी रचलेला असावा. पैतामह आणि वासिष्ठ हे रोमकाहून प्राचीन असें वर दाखविलेंच आहे. तसेंच पंचसिद्धांतिकेंतील सूर्यसिद्धांत आणि पुलिशसिद्धांत हेही रोमकाहून प्राचीन असे मला वाटते. कारण एक तर ब्रह्मगुप्ताच्या दृष्टीने रोमकापेक्षा इतर ४ सिद्धांत जास्त पूज्य आहेत असें त्याच्या ग्रंथावरून स्पष्ट दिसते. त्या चोहोंस त्याने दूषण कोठेच दिले नाही. ब्रह्मगुप्तानंतर तर रोमकसिद्धांत मूलरूपाने म्हणा किंवा श्रीषणतरूपाने म्हणा, उपयोगांतून अगदीच गेला असे दिसते. बृहत्संहिताटीकेंत ग्रहगणिताच्या कोणत्याही प्रसंगांत रोमकांतला आधार उत्पलानें कोठेच घेतला नाही. पुलिशसिद्धांत, सूर्यसिद्धांत, पहिल्या आर्यभटाचा सिद्धांत, किंवा ब्रह्मगुप्तसिद्धांत, यांचा आधार घेतला आहे. उत्पलाच्या वेळी मूलरोमकसिद्धांत मूलरूपाने लोपलाच असावा असे दिसतें. सांप्रत रोमकसिद्धांत ह्मणून एक आहे परंतु त्यांतील मानें सांप्रतच्या सूर्यसिद्धांताप्रमाणेच आहेत, निराळी नाहीत. आणि तो तसा तरी रोमकसिद्धांत सांप्रत कोणास फारसा माहित आहे असे नाही. यावरून सिद्धांतपंचकापैकीं इतर सिद्धांताचे जे पूज्यत्व ते त्यांच्या रोमकाहून प्राचीनतरत्वामुळे असावें. रोमकसिद्धांत हा पांच सिद्धांतांत अर्वाचीन ह्याविषयी आणखीही एक महत्वाचे प्रमाण आहे. तें असें : निरनिराळ्या ज्योतिषग्रंथांतील वर्षमानें. दि. व. प. विपळ प्रतिविपळे. वेदांगज्योतिष (पितामहसिद्धांत ३६५ २१ २५ वसिष्ठसिद्धांत पुलिशसिद्धांत ३६५ १५ ३०० सूर्यसिद्धांत (रोमकसिद्धांत प्रथम आर्यसिद्धांत ३६५ १५ ३१ ब्रह्मगुप्तसिद्धांत ३६५ १५ ३० सांप्रतचे सूर्यवसिष्ठ शाकल्यरोमक ३६५ १५ ३१३१ सोम हे सिद्धांत द्वितीय आर्य सिद्धांत ३६५ १५ ३१. १७६ राजमगांक, करणकुतूहल, इ. ३६५ १५ ३१ १७ १ ७३ ह्या वर्षमानांत रोमकाचे मान खेरीज करून बाकी मानांत कोणतेही ३६५ दि. १५ घ. ३० पळे याहून कमी नाही. आणि वेदांगज्योतिषांतलें आणि पितामहसि पंचसिद्धांतिकोक्त १५ ३१ ३६५ १४४