पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५७) प्रतिपदा कसे झटले ही शंका येते. क्षेपकापुटली शुक्लप्रतिपदा शके ४२७ अमांत वैशाखशुक्लांतील आहे याविषयीं तर तिलप्रायही संशय नाही. मेषींचा रवि असतां ज्या चांद्रमासाचा अंत होईल तो चैत्र अशी परिभाषा* आहे. या परिभाषेनें मध्यममेष किंवा स्पष्टमेष घेऊनही क्षेपकाच्या दुसऱ्या दिवशी जी अमावास्या होती तिच्या अंती मेषींचा रवि होता. ह्मणून त्या अमावास्येबरोबर जो अमांतमास संपला तो चैत्रच होता व भौमवारी वैशाख लागला. परंतु पूर्णिमान्त मानाचा महिना पूर्णिमेस संपतो, ह्मणून क्षेपकानंतर जो शुक्लपक्ष लागला त्याची पूर्णिमा जेव्हां संपेल तेव्हां तो मास संपावयाचा. त्या पूर्णिमेच्या अंती रवि मेषींचाच होता, असें पंचसिद्धांतिकाक्षेपकावरून गणिताने येते. ह्मणून त्या महिन्यास नांव चैत्रच आले. याखेरीज दुसरी काही उपपत्ति चैत्र झणण्याची मला दिसत नाही. उत्तरहिंदुस्थानांत पूर्णिमांत मास फार प्राचीन कालापासून मानतात. सांप्रत तिकडे पूर्णिमांत मान आहे तरी महिन्यांची नांवें वर सांगितलेल्या रीतीने देत नाहीत. परंतु वराहमिहिराच्या वेळी शुद्धरीति चालू असेल असे दिसते. आठव्या अध्यायाच्या पहिल्या आर्यंत रोमकसिद्धांताप्रमाणे सूर्यसाधन दिले आहे. तें असें: रोमकसूर्यो युगणात खतिथि ( १५०) मात् पंचकर्तु (६५) परिहीनात् ॥ सप्ताष्टकसप्तकृतेंद्रियो ५४७८७ द्वतान्मध्यमार्कः सः॥ अहर्गणास १५० नी गुणून त्यांत ६५ वजा करून बाकीला ५४७८७ यांनी भागिले ह्मणजे सूर्य येतो. यांत ६५ वजा करणे ते क्षेपकाकरितां आहेत. सूर्य निघतो तो भगणादि निघतो (भगण ह्मणजे नक्षत्रमंडलांतून एक पूर्ण प्रदक्षिणा). आर्येत तसे स्पट नाहीं तरी तें निःसंशय आहे. ५४७८७ दिवसांत सूर्याचे १५० भगण होतात ह्मणजे एका भगणास अगदी बरोबर ३६५ दिवस १४ घटिका ४८ पळे लागतात. यावरून रोमकसिद्धांताचें वर्षमान इतकें असें सिद्ध होतें. सांप्रतच्या सूर्यासद्धांताचें वर्षमान ३६५ दि. १५ व ३१ प. ३१.४ विप. आहे. इतर सिद्धांतांत युगादि माने आहेत तशी रोमकांत नाहीत असें ब्रह्मगुप्तानें दूषण दिले आहे, व ते खरे आहे असें खालील विवेचनावरून दिसून येईल. इतर सिद्धांतांशी तुलना करण्यास बरें पडावें मणून एका महायुगांत ह्मणजे ४३२०००० वर्षांत चंद्राचे भगण इत्यादि मानें रोमक सिद्धांताप्रमाणे निघतात ती खाली देतो. ती पंचसिद्धांतीकेंतील ज्या आर्यांच्या आधारानें काढिलीं त्या अशा: रोमकयुगकमर्केदोर्वर्षाण्याकाशपंचवसुपक्षः (२८५०) खंद्रियदिशो (२०५०)धिमासाः स्वरकृत विषयाष्टयः(१६५४७) प्रलयाः ॥१५॥ अध्याय १. अर्थ.-२८५० वर्षांचे रोमक युग. त्यांत १०५० अधिमास आणि १६५४७ प्रलय झणजे तिथिक्षय. शन्यैकैका(११०)भ्यस्तान्नवशून्यरसा(६०९)न्वितादिनसमूहात् ।। रूपत्रिखगुण (३०३१)भत्ताकेंद्रं शशिनोस्तगमवंत्याम् ॥ ५ ॥

  • मेषादिस्थे सवितरि यो यो मासः प्रपूर्यते चांद्रः ।। चैत्रादिः स ज्ञेयः॥ या परिभाषेविषयीं जास्त विचार स्पष्टाधिकारांत येईल.