पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विषय. (१५) पंचसिद्धांतिकेत पहिल्याच अध्यायांत वराहमिहिर ह्मणतो की पोलिशति*विस्फटोसौ तस्यासन्नस्तु रोमकः प्रोक्तः ॥ स्पष्टतरः सावित्रः परिशेषौ दूरविभ्रष्टौ ॥ ४ ॥ यावरून दिसते की पंचसिद्धांतिकाकाली पौलिशसिद्धांत बराच स्पष्ट हाता. ह्मणजे त्यावरून दृक्प्रत्यय बराच मिळत असे. रोमक त्याच्या जवळ जवळ होता. सूर्यसिद्धांत दोहोंतून जास्त स्पष्ट होता. आणि बाकी राहिलेले वासिष्ठ आणि पैतामह हे फार दूर गेले होते. ह्मणजे त्यांवरून हकप्रत्यय मिळत नसे. पितामहासद्धांत आणि वासिष्ठ हे पांचांमध्ये प्राचीन असावे. त्यांतही पितामह सर्वांत प्राचीन असावा असे माझे मत आहे. त्याची कारणे पुढे येतील. आतां प्रथम पितामह सिद्धांताचा विचार करूं.. पितामहसिद्धांत. पितामहसिद्धांतांतील मूलतत्त्वें पंचसिद्धांतिकेच्या १२ व्या अध्यायांत आहेत. त्या अध्यायाच्या केवळ पांचच आर्या आहेत. इतरत्र कोठे ही पंचसिद्धांतिकेंत या सिद्धांतांतील कांहीं आलें नाहीं. पांचांपैकी पहिल्या दोन आर्या अशा आहेतः । रविशशिनोः पंच युगं वर्षाणि पितामहोपदिष्टानि ॥ अधिमासस्त्रिंशद्भिर्मासैरवमनिषष्ट्यान्हां ॥ व्यूनं शकेंद्रकालं पंचभिरुद्धत्य शेषवर्षाणां ॥ युगणं माघासताद्यं कुर्याागणस्तदन्युदयात् ॥ २॥ अर्थ-पितामहाने सांगितल्याप्रमाणे चंद्रसूर्यांची पांच वर्षे [हें एक ] युग. तीस मासांनी अधिमास. ६३ दिवसांनी क्षयदिवस. शकेंद्रकालांत दोन वजा करून बाकीला ५ नीं भागून बाकी वर्षांचा अहर्गण माघ शुक्लादिपासून करावा. [ तो] त्या | इष्ट ] दिवशी [युगण होतो. तो] उदयापासून [होतो. या पांचव्या आर्यंत दिनमान काढण्याची रीति आहे. द्विनं शशिरस (६१) भक्तं द्विादशहीनं दिवसमानं ॥ [उदगयनाचे जे दिवस गेले असतील किंवा दक्षिणायनाचे जावयाचे असतील त्यांस ] २ नी गुणून ६१ नी भागावें. त्यांत १२ [ मुहूर्त ] मिळवावे ह्मणजे दिनमान होतें. यावरून व दुसऱ्या आयत नक्षत्र काढण्याची रीति आहे तींत धनिष्ठांपासून नक्षत्र समजावें असें मटले आहे यावरून पितामहसिद्धांताचें वेदांगज्योतिषपद्धतीशी साम्य आहे हे दिसून येईल. पितामहसिद्धांतांतली पद्धति वराहमिहिराने शककालाच्या संबंधे दिली आहे, परंतु त्याने केवळ अहर्गण साधण्याकरितां तसे केले आहे. रचनाकाल. इतर सिद्धांतांतील पद्धति दिल्या आहेत, त्यांतही अहर्गण र शके ४२७ पासून साधला आहे. परंतु त्यावरून ते सिद्धांत * पंचसिद्धांतिकेंतील आर्या माझ्या पुस्तकांत जशा आहेत तशाच एथे दिल्या आहेत. डा० थिबो याने नवीन पाठ घातले आहेत त्यांतले मला योग्य वाटले ते कोठे कोठे घेतले आहेत. + यांत " हीनं" हे अशुद्ध आहे. तेथे युक्तं असें पाहिजे. आर्येचे पूर्वार्ध अशुद्ध आहे म्हणन एथे दिले नाही; परंतु कंसांत त्याचा जो अर्थ दिला आहे त्याहून त्यांत जास्त कांहीं नाहीं.